अपघातात सासऱ्याचा मृत्यू; मुलगी, जावई जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 10:42 PM2022-02-08T22:42:10+5:302022-02-08T22:43:16+5:30

Nagpur News भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात सासऱ्याचा मृत्यू झाला तर मुलगी व जावई जखमी झाले.

Death of father-in-law in an accident; Daughter, son-in-law injured | अपघातात सासऱ्याचा मृत्यू; मुलगी, जावई जखमी

अपघातात सासऱ्याचा मृत्यू; मुलगी, जावई जखमी

Next
ठळक मुद्देट्रकची माेटरसायकलला धडक

नागपूर : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात सासऱ्याचा मृत्यू झाला तर मुलगी व जावई जखमी झाले. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड-गिरड (जिल्हा वर्धा) मार्गावरील बेसूर शिवारात रविवारी (दि. ६) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

गाेविंद शामराव सातारकर, रा. सावंगी (झाडे), ता. समुद्रपूर, जिल्हा वर्धा असे मृताचे नाव असून, या अपघातात सुधीर गुलाबराव भुजाडे (५४, रा. न्यू अड्याळवाले ले-आऊट, उमरेड) व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. गाेविंद सातारकर हे सुधीर भुजाडे यांचे सासरे हाेत. सुधीर भुजाडे, त्यांच्या पत्नी व सासरे एम.एच.-४०/ई-८३४४ क्रमांकाच्या माेटरसायकलने सावंगी (झाडे) येथून उमरेडला येत हाेते.

दरम्यान, बेसूर (ता. उमरेड) शिवारात विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या एम.एच.-४०/एन-५९३६ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली आणि ट्रक निघून गेला. यात माेटरसायकलवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी गाेविंद सातारकर यांना तपासणीअंती मृत घाेषित केले. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी सुधीर भुजाडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Death of father-in-law in an accident; Daughter, son-in-law injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात