भावाच्या डोळ्यासमोर धाकट्या बहिणीचा मृत्यू; सिमेंट क्रॉंक्रीट मिक्सर मशीनने चिरडले 

By सुनील चरपे | Published: July 22, 2023 06:52 PM2023-07-22T18:52:42+5:302023-07-22T18:52:55+5:30

पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी जात असलेल्या भाऊ-बहिणीच्या ॲक्टिव्हाची धडक आडव्या आलेल्या गायीला लागली आणि दोघेही रोडवर कोसळले.

Death of younger sister in front of brother Cement croncrete crushed by mixer machine | भावाच्या डोळ्यासमोर धाकट्या बहिणीचा मृत्यू; सिमेंट क्रॉंक्रीट मिक्सर मशीनने चिरडले 

भावाच्या डोळ्यासमोर धाकट्या बहिणीचा मृत्यू; सिमेंट क्रॉंक्रीट मिक्सर मशीनने चिरडले 

googlenewsNext

टाकळघाट (नागपूर) : पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी जात असलेल्या भाऊ-बहिणीच्या ॲक्टिव्हाची धडक आडव्या आलेल्या गायीला लागली आणि दोघेही रोडवर कोसळले. भावाने जखमी अवस्थेत स्वत:ला सावरले. मात्र, बहीण मागून वेगात आलेल्या ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने तिचा भावाच्या डोळ्यादेखत घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी एमआयडीसी (ता. हिंगणा) परिसरात शनिवारी (दि. २२) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

तनिशा निळकंठ कावळे (१७) असे मृत बहिणीचे तर गौरव निळकंठ कावळे (२१) दोघेही रा. टाकळघाट, ता. हिंगणा असे जखमी भावाचे नाव आहे. तनिशा ही हुडकेश्वर नागपूर येथील सेंट पॉल स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकायची तर गौरव बाहेरगावी ॲग्रीकल्चरचे शिक्षण घेतो. सुत्यांचे आईवडील मुलांच्या शिक्षणासाठी काही दिवसांपासून ड्रीम कॉलनी, बुटीबोरी, ता. नागपूर (ग्रामीण) येथे राहतात. टी असल्याने गौरव गावी आला होता.

तनिशाला पुस्तके हवी असल्याने ते खरेदी करण्यासाठी दाेघेही एमएच-४०/सीके-१६७६ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने एमआयडीसी परिसरातून दुकानाकडे जात होते. त्यांच्या ॲक्टिव्हासमोर ट्रक होता. दुभाजक पार करताच मध्ये गाय आडवी गेली. त्यामुळे गौरवचा ताबा सुटला आणि ॲक्टिव्हाची गायीला धडक लागल्याने दोघेही रोडवर कोसळले. गौरवने जखमी अवस्थेत स्वत:ला सावरले. मात्र, तनिशा मागून वेगात आलेल्या टीएस-०६/यूबी-२१५४ क्रमांकाच्या सिमेंट कॉंक्रीट मिक्सर मशीनच्या चाकाखाली आली. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी मिक्सर मशीन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मोकाट गुरे अपघातांना कारणीभूत
एमआयडीसी परिसरात २४ तास वाहनांची वर्दळ असते. त्यातच या भागातील तसेच बुटीबोरी येथील मुख्य व अतंर्गत रोडवर मोकाट गुरांचा सतत ठिय्या असतो. धीट झालेली ही गुरे हालकून अथवा हॉर्नच्या आवाजामुळे बाजूला होत नाही. ती भरधाव वाहनांना अचानक आडवी जात असल्याने अपघात होतात. ही बाब सर्वांना माहिती असून, कुणीही त्या गुरांचा कायम बंदोबस्त करणे व त्यांच्या मालकांवर कठोर कारवाई करण्याचे साधे धाडसही करीत नाही.
 

Web Title: Death of younger sister in front of brother Cement croncrete crushed by mixer machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.