माथेफिरूच्या हल्ल्यातील जखमी सानिकाचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 07:44 PM2018-09-20T19:44:32+5:302018-09-20T21:19:17+5:30

एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने केलेल्या चाकुहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका प्रदीप थुगांवकर (वय १८) हिचा अखेर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ जुलैला रात्री ७.४५ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या आठ रस्ता चौकाजवळ ही थरारक घटना घडली होती. तेव्हापासून सानिका मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिचा संघर्ष आज संपला.

The death of Sanika in the attack of maniac | माथेफिरूच्या हल्ल्यातील जखमी सानिकाचा अखेर मृत्यू

माथेफिरूच्या हल्ल्यातील जखमी सानिकाचा अखेर मृत्यू

Next
ठळक मुद्देएकतर्फी प्रेमाचा बळी ठरली : पावणेतीन महिने मृत्यूशी झुंज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने केलेल्या चाकुहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका प्रदीप थुगांवकर (वय १८) हिचा अखेर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ जुलैला रात्री ७.४५ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या आठ रस्ता चौकाजवळ ही थरारक घटना घडली होती. तेव्हापासून सानिका मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिचा संघर्ष आज संपला.
टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिकणारी सानिका अशोका हॉटेलसमोर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमलगत तिच्या मामांचे (अविनाश पाटणे) फायनान्स कार्यालयात काम करायची. खामल्यातील रोहित हेमनानी (बोलाणी) नामक माथेफिरूसोबत तिचे दोन वर्षांपासून मित्रत्वाचे संबंध होते. तो खामल्यातील सिंधी कॉलनीत राहतो. त्याचे मोबाईल शॉप आहे. काही दिवसांपूर्वी त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात आल्याने त्याला सानिकाने टाळणे सुरू केले. त्यामुळे आरोपी संतापला होता. ब्रेकअप करण्यापूर्वी शेवटचे एकदा भेटू असे म्हणून आरोपी हेमनानीने तिला गळ घातली होती. त्यामुळे तिने त्याला १ जुलैला रात्री मामांच्या (पाटणेंच्या) कार्यालयात भेटायला बोलवले होते. तो तेथे आला काही वेळ चांगला बोलला. नंतर आरोपी हेमनानीने पँटमध्ये लवपून ठेवलेला चाकू बाहेर काढून अचानक सानिकावर चाकूचे सपासप घाव घातले. छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे घाव बसल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तेव्हापासून सानिकावर खामल्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या सानिकाच्या आईवडिलांनी पावणेतीन महिन्यात होते नव्हते विकून, कर्जबाजारी होऊन उपचाराचा खर्च केला. सानिकानेही तब्बल पावणेतीन महिने जगण्या-मरण्याची लढाई लढली मात्र आज अखेर तिचा संघर्ष थांबला.

Web Title: The death of Sanika in the attack of maniac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.