निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:05+5:302021-05-10T04:09:05+5:30

नागपूर : आंबेडकरी चळवळीतील नव्या पिढीतील झुंजार कार्यकर्ते सुरेश तेलंग (६२) यांचे निधन झाले. त्यांनी मेडिकलच्या मागील बाजूला असलेल्या ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

नागपूर : आंबेडकरी चळवळीतील नव्या पिढीतील झुंजार कार्यकर्ते सुरेश तेलंग (६२) यांचे निधन झाले. त्यांनी मेडिकलच्या मागील बाजूला असलेल्या १४ एकर सिलिंगच्या जागेवर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेनगर ही वसाहत बसविली. त्या वसाहतीत त्यांनी गरीब, बेघर, निराधार व्यक्तींना जागा दिली. वसाहतीतील प्रत्येक मार्गाला त्यांनी बहुजन महापुरुषांची नावे दिली. त्यांनी पंजाबराव देशमुख यांच्या नावाने ग्रंथालयही चालविले. त्यांनी दलित मुक्ती सेना, रिपब्लिकन पक्ष, भारिपा, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस अशा विविध पक्षात कार्य केले. संघर्षशील व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांनी वसाहतीत वीज, रस्ते, पाणी उपलब्ध करून दिले. मानेवाडा घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बळीराम फुलारी ()

बळीराम सीताराम फुलारी (८१) यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशनचे वरिष्ठ संस्थापक सदस्य, माजी उपाध्यक्ष आणि सल्लागार होते. ते पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, भंडारा आदी ठिकाणी कार्यरत होते. नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत सुनील फुलारी यांचे ते वडील होत.

अमर महाशब्दे ()

ज्येष्ठ पत्रकार अमर महाशब्दे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. आणीबाणीच्या काळात ते नाशिक कारागृहात स्थानबद्ध होते. बापू महाशब्दे पत्रकारिता महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते.

कमलाबाई पांडे ()

कमलाबाई शंकरराव पांडे (९०, रा. शिरलस, जि. अमरावती) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली आहेत. त्यांच्यावर सावल, जि. वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वर्णलता मोहबंसी ()

स्वर्णलता मुकुट मोहबंसी (रा. एमआयजी फ्लॅट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुधाकरराव पिलारे ()

सुधाकरराव भैय्याजी पिलारे (६५, रा. कापसी खुर्द, बराद्वरी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार बरद्वरी घाट येथे करण्यात आले.

शशी खापेकर

शशी नत्थूजी खापेकर (६३, रा. बेलतरोडी रोड, बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुलाबराव शिंदे ()

गुलाबराव शिंदे (८५, रा. कोठी रोड महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीकृष्णराव लखपती ()

श्रीकृष्णराव महादेवसा लखपती (९३, रा. जुना सुभेदार) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रतीराम पाटील ()

रतीराम श्रावण पाटील (६६, रा. १२१, नागसेन सोसायटी, न्यू मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप लोखंडे ()

दिलीप गजानन लोखंडे (५७, रा. गोपालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

परशुराम बालपांडे ()

परशुराम बिजाराम बालपांडे (६९, रा. ७२ नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हनुमानमल शर्मा ()

हनुमानमल शर्मा (९९, रा. यश प्लाझा, सेंट्रल एव्हेन्यू रोड) यांचे निधन झाले. ते दाधीच समाजाचे सल्लागार होते. अंत्यसंस्कार सोमवारी सकाळी १० वाजता वाठोडा घाट येथे करण्यात येतील.

कविता मेंदिरेत्ता ()

कविता मेंदिरेत्ता (६८, रा. ६९, अमृता गीता अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

महेश गहाणे ()

महेश गोविंद गहाणे (३७) यांचे निधन झाले. ते मूळचे नागपूरचे रहिवासी असून सध्या ते ठाणे येथे राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि बहीण आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्रिमूर्तीनगर भागाचे भाग संघचालक गोविंद गहाणे यांचे सुपुत्र तसेच राष्ट्रसेविका समितीच्या पदाधिकारी डॉ. लीना गहाणे यांचे भाऊ होत. ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेशचंद्र पाटील ()

नरेशचंद्र दिनकर पाटील (५१, रा. राजेंद्रनगर ले-आऊट, हिंगणा नाका) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील वाघमारे ()

सुनील प्रल्हाद वाघमारे (रा. विठ्ठलवाडी) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल.

अजय डाखोरे ()

अजय बबनराव डाखोरे (५४, रा. एमआयजी रामबाग कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

..............

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.