निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:53+5:302021-05-17T04:07:53+5:30

नागपूर महानगराच्या माजी महापौर पुष्पाताई घोडे (६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रतीक, प्रतीक्षा आणि ज्योती या दोन ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

नागपूर महानगराच्या माजी महापौर पुष्पाताई घोडे (६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा प्रतीक, प्रतीक्षा आणि ज्योती या दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. नागपूरच्या यशस्वी महापौर, १९९७ ते २०१२ या काळात सलग तीन वेळा नगरसेविका, शिक्षण सभापती, महिला व बाल कल्याण सभापती अशी पदे त्यांनी यशस्वीरीत्या हाताळली. राजकारणातून निवृत्तीनंतर त्यांनी गायत्री परिवारासोबत समाजकार्य केले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलावती अवचट ()

कलावती बाजीराव अवचट (६७, रा. प्लॉट नं. ३०५ जवाहरनगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

दुलारी गुप्ता ()

दुलारी बद्रीप्रसाद गुप्ता (७५, रा. देवलापार) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली आहेत. अंत्यसंस्कार देवलापार येथे करण्यात आले.

निखिल कुळकर्णी ()

निखिल प्रशांत कुळकर्णी (३३, रा. २२ अ, विनोबा ग्राम सोसायटी, इंद्रप्रस्थनगर) यांचे निधन झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग सहकार्यवाह होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांता कान्होलकर ()

कांता शंकरराव कान्होलकर (७१, रा. चक्रधरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

काशीनाथ लोखंडे ()

काशीनाथ तुळशीराम लोखंडे (७४, रा. १५, सरस्वती विहार कॉलनी, त्रिमूर्तीनगरजवळ) यांचे निधन झाले. ते विस्फोटक पदार्थ विभागातून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यसंस्कार सोमवारी सकाळी ११.३० वाजता अंबाझरी घाट येथे करण्यात येतील.

गुणवंत भजे ()

गुणवंत मनोहर भजे (४३, रा. प्लॉट नं. ४९३, देवाश्री अपार्टमेंट, श्रीनगर, नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नामदेव लांजेवार

नामदेव लांजेवार (८३, रा. केंद्र विद्यालयासमोर, शिवाजीनगर, महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश कापरे ()

रमेश गंगाधर कापरे (रा. नवनाथ सोसायटी मस्के ले आऊट, सर्वत्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रोहिणी, भाऊ प्रदीप, पुतण्या सारंग आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्चना गोतमारे ()

अर्चना अविनाश गोतमारे (४९, रा. पाटणसावंगी) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पती, मुलगा, मुलगी, तीन भाऊ आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. महापारेषणचे अधीक्षक अभियंता अविनाश निंबाळकर यांच्या त्या भगिनी होत. पाटणसावंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रा. डॉ. प्राची ताकसांडे ()

प्रा. डॉ. प्राची एकनाथ ताकसांडे (३७, रा. सदर बुद्ध विहार) यांचे निधन झाले. त्या नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, आई-वडील, भाऊ आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. रिपाइंचे नेता एकनाथ ताकसांडे यांच्या त्या मुलगी होत. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बापूराव क्षीरसागर

बापूराव नारायण क्षीरसागर (८९, रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगदीश कुकासे

जगदीश चंदनलाल कुकासे (५३, रा. वैष्णोदेवीनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेमंद यादव

हेमंत बद्रीप्रसाद यादव (६५, रा. शिवछत्रपतीनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंदीबाई क्रिष्णानी

चंदीबाइ किंमतराय क्रिष्णानी (८८, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

..........

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.