मृताच्या बोटातील अंगठ्या लंपास

By admin | Published: September 23, 2016 02:58 AM2016-09-23T02:58:23+5:302016-09-23T02:58:23+5:30

ट्रकने चिरडलेल्या मृत शिक्षकाच्या बोटातील दोन अंगठ्या आरोपीने काढून घेतल्या.

Death thump in the dead body | मृताच्या बोटातील अंगठ्या लंपास

मृताच्या बोटातील अंगठ्या लंपास

Next

नंदनवनमधील प्रकार : टाळूवरचे लोणी खाणारे नराधम कोण ?
नागपूर : ट्रकने चिरडलेल्या मृत शिक्षकाच्या बोटातील दोन अंगठ्या आरोपीने काढून घेतल्या. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी झालेल्या अपघातानंतर हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला. यामुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, टाळूवरचे लोणी खाणारे नराधम कोण, असा प्रश्नही विचारला जात आहे.
मूळचे बिहारमधील रहिवासी असलेले उदय शंकरनवल किशोरप्रसाद सिंह (वय ४३) हे रामकृष्णनगर, दिघोरी येथे राहत होते. खासगी क्लासेसमध्ये शिक्षक असलेले उदय सिंह बुधवारी दुपारी २.१५ वाजता आपल्या अ‍ॅक्टिव्हाने (एमएच ४९/ एएफ ६४०२) दिघोरी चौकाकडे जात होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी चारुल (वय १९) हीसुद्धा होती. आदर्शनगर, उमरेड रोडवर स्वाती किराणा दुकानासमोर ट्रक (एमएच ४० / एके ३८८०) च्या आरोपी चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून सिंह यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे दोघेही बापलेक खाली पडले आणि आरोपी ट्रकचालकाने सिंह यांना चिरडले.
चारूलच्या डाव्या पायाला व डाव्या डोळयाजवळ किरकोळ मार लागला. अपघातानंतर आरोपी चालक ट्रक घेऊन पळून गेला. या अपघातानंतर मोठा जमाव जमला. तणावाची स्थिती निर्माण झाली. सिंह यांचा मोबाईल बाजूला पडला होता. त्यावरून फोन करून एकाने ही माहिती कुटुंबीयांना कळवली. परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळाल्याने जमावातील काही जणांना सोबत घेऊन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मृतदेह मेडिकलमध्ये हलविला. शवविच्छेदन करण्यापूर्वी सिंह यांच्या हाताच्या बोटातील दोन अंगठ्या अज्ञात आरोपीने लंपास केल्याचे उघड झाले. माणुसकीला काळीमा फासणारी बाब उघड झाल्यानंतर शोकसंतप्त सिंह परिवार आणि त्यांच्या आप्तस्वकीयांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. (प्रतिनिधी)

आरोपी चालकाचा छडा लागला
मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारा हा प्रकार असून अंगठ्या लंपास करणारा तो नराधम कोण, त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रकच्या नंबरवरून पोलिसांना मालकाचा पत्ता गवसला. त्याआधारे ठाणेदार सुनील महाडिक यांनी पोलीस उपनिरीक्षक एन. एच. विठोले यांना ट्रकचालक आरोपीचा शोध घेण्यासाठी पाचगाव भागात रवाना केले. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचा शोध लागला नव्हता.

Web Title: Death thump in the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.