आमघाट वनपरिसरात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:11 AM2021-09-09T04:11:35+5:302021-09-09T04:11:35+5:30

नागपूर : बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील आमघाट या जंगलव्याप्त परिसरात वाघाच्या बछड्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. हा बछडा दीड वर्षांचा असल्याचा ...

Death of a tiger calf in Amghat forest area | आमघाट वनपरिसरात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

आमघाट वनपरिसरात वाघाच्या बछड्याचा मृत्यू

Next

नागपूर : बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील आमघाट या जंगलव्याप्त परिसरात वाघाच्या बछड्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. हा बछडा दीड वर्षांचा असल्याचा अंदाज आहे. कम्पार्टमेंट क्रमांक ३९४ येथे हा प्रकार उघडकीस आला असून डोक्यावर आढळलेल्या जखमांवरून प्राण्यांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

बुटीबोरी वनपरिक्षेत्र आमघाट कम्पार्टमेंट नं ३९४ , उमरेड येथे मंगळवारी सायंकाळी एका गुराख्याला बछड्याचा मृतदेह दिसला. गावात ही वार्ता पसरताच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी ही माहिती वन अधिकाऱ्यांना दिली. नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा, बुटीबोरी रेंजचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर एल. व्ही. ठोकळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक अहवालानुसार वाघाच्या शरीराचे सर्व अवयव अखंड असल्याचे आढळून आले. दरम्यान, मागील १५ दिवसांत या परिसरात चार ते पाच गुरांच्या हत्येची नोंद झाली आहे.

नागपूरपासून सुमारे ६५ किलोमीटरवर हे घटनास्थळ असून उमरेड तहसीलमध्ये बेला या गावाजवळ आमघाट गाव आहे. ज्या ठिकाणी वाघ मृतावस्थेत आढळला तो परिसर मुनिया राखीव संवर्धन क्षेत्राजवळ आहे. कॅमेरा ट्रपमधील छायाचित्रांवरून या परिसरात एक वाघ, वाघिण आणि दोन बछडे असल्याची माहिती आहे.

एनटीसीए प्रोटोकॉलनुसार, मुख्य मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पशुवैद्यकांच्या चमूने शवविच्छेदन केले. तपासासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी व्हिसेराचे नमुने गोळा करण्यात आले. प्राथमिक गुन्ह्याचा अहवाल नोंदवण्यात आला असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास केला जात आहे.

Web Title: Death of a tiger calf in Amghat forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.