नागपुरात मृत्यूचे थैमान सुरूच, ११० ‘कोरोना’ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:08 AM2021-04-23T04:08:58+5:302021-04-23T04:08:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोमवारनंतर तीनच दिवसात जिल्ह्यात परत एकदा कोरोनाबळींचा आकडा शंभरावर गेला आहे. गुरुवारी जिल्ह्यामध्ये ११० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारनंतर तीनच दिवसात जिल्ह्यात परत एकदा कोरोनाबळींचा आकडा शंभरावर गेला आहे. गुरुवारी जिल्ह्यामध्ये ११० कोरोबाधितांचा मृत्यू झाला, तर सात हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले. २४ तासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे.
गुरुवारी जारी झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ७ हजार ३४४ नवे बाधित आढळले. यातील ४ हजार ६१९ शहरातील तर २ हजार ७१८ ग्रामीण भागातील आहेत. तर मृतांमध्ये ५८ शहरातील, ४५ ग्रामीणमधील व जिल्ह्याबाहेरील सात जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३ लाख ५० हजार ९३३ बाधित व ६ हजार ६८५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
चाचण्यांची संख्या घटली
बुधवारी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त होती. मात्र गुरुवारी बरे होणाऱ्यांचा आकडा ६ हजार ३१४ वर आला. यात शहरातील ३ हजार ८४८, तर ग्रामीणमधील २ हजार ७१८ जणांचा समावेश आहे. चाचण्यांची संख्यादेखील घटली. २१ हजार ५८५ जणांची चाचणी झाली. यात शहरातील १६ हजार २७६ जणांचा समावेश होता.
सक्रिय रुग्ण ७२ हजार
जिल्ह्यात ७२ हजार ४७७ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील ४४ हजार ४६७ व ग्रामीणमधील २८ हजार १० जणांचा समावेश आहे. सरकारी व खासगी रुग्णालयात १६ हजार ५६ रुग्ण दाखल आहेत, तर ५६ हजार ४२१ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.
असे वाढले मृत्यू
दिनांक - मृत्यू - नवे ‘पॉझिटिव्ह’
१५ एप्रिल - ७४ - ५,८१३
१६ एप्रिल - ७५ - ६,१९४
१७ एप्रिल - ७९ - ६,९५६
१८ एप्रिल - ८५ - ७,१०७
१९ एप्रिल - ११३ - ६,३६३
२० एप्रिल – ९१ – ६,८९०
२१ एप्रिल – ९८ – ७,२२९
२२ एप्रिल – ११० – ७,३४४