नागपूर-उमरेड मार्गावर भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या क्लिनरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 09:52 PM2019-04-25T21:52:58+5:302019-04-25T21:54:04+5:30

उमरेड मार्गावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या क्लिनरचा मृत्यू झाला. तेजस नरुला असे मृताचे नाव असून तो चंद्रपूरचा रहिवासी असल्याचे कळते. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने वाहतूक अडवून धरली. त्यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.

The death of the traveler's cleaner in a serious accident on the Nagpur-Umred road | नागपूर-उमरेड मार्गावर भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या क्लिनरचा मृत्यू

नागपूर-उमरेड मार्गावर भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या क्लिनरचा मृत्यू

Next
ठळक मुद्देरास्ता रोको, तणाव : मृत तरुण चंद्रपूरचा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड मार्गावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या क्लिनरचा मृत्यू झाला. तेजस नरुला असे मृताचे नाव असून तो चंद्रपूरचा रहिवासी असल्याचे कळते. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने वाहतूक अडवून धरली. त्यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.
तेजस खासगी प्रवासी बसवर (ट्रॅव्हल्स) वाहक म्हणून काम करायचा. नेहमीप्रमाणे चंद्रपुरातून प्रवासी घेऊन तो एमएच ४०/ बीजी ०६२२ ने गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास नागपुरात आला. नागपुरात विविध ठिकाणी प्रवासी उतरत असल्याने तसेच चालकाला दुसऱ्या बाजूला काही अडथळे नसल्याचे सांगण्यासाठी तो दारावर उभा होता. भांडे प्लॉट चौकाजवळ एक ट्रॅक्टर (एमएच ३१/ एएच ७५४०) आले. या ट्रॅक्टरमध्ये ठेवून असलेल्या बल्लीमधील एक बल्ली बाहेर निघाली होती. दोन्ही वाहने जवळ आली असताना बाहेर आलेल्या बल्लीचे टोक तेजसच्या डोक्याला लागले. त्यामुळे तो खाली पडून त्याच्याच बसच्या चाकात चिरडला गेला. या भीषण अपघातामुळे अल्पावधीतच तेथे मोठा जमाव जमला. वाहने आडवेतिडवे झाल्याने तेथे रास्ता रोकोची स्थिती झाली. प्रचंड तणावही निर्माण झाला. माहिती कळताच वाहतूक शाखा तसेच सक्करदरा पोलीस तेथे पोहचले. त्यांनी जमावाला शांत करत तेजसचा मृतदेह रुग्णालयात पाठविला.
विशेष म्हणजे, वाहतुकीच्या अनुषंगाने हा मार्ग अतिशय धोकादायक असल्याचे वारंवार उघड झाले आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होतात. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडेही त्याची नोंद आहे. मात्र, आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाही.
मानकापुरातही अपघात
बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पागलखाना चौकाजवळ दोन वाहनचालकांच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीचालक भीमराव सुखदेवे (वय ५८) यांचा करुण अंत झाला. सुखदेवे वेलकम सोसायटीत राहत होते. बुधवारी सायंकाळी ते अ‍ॅक्टीव्हाने (एमएच ३१/ ईएक्स ५६५०) पागलखाना चौकाकडे जात होते. एनएडीटी गेटसमोर एसटी बस क्रमांक एमएच ४०/ एन ८४९८ तसेच स्विफ्ट क्रमांक एमएच ४९/ एटी ११०८ च्या चालकाने एकमेकांना धडक मारली. त्यानंतर सुखदेवे यांच्या दुचाकीला धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अभय भीमराव सुखदेवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी बस आणि स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: The death of the traveler's cleaner in a serious accident on the Nagpur-Umred road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.