लस घेतल्यानंतर दोन तासातच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:52+5:302021-07-05T04:06:52+5:30

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन तासातच हृदयविकाराचा झटका येऊन एका पुरुषाचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका ...

Death within two hours after vaccination | लस घेतल्यानंतर दोन तासातच मृत्यू

लस घेतल्यानंतर दोन तासातच मृत्यू

Next

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन तासातच हृदयविकाराचा झटका येऊन एका पुरुषाचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, परंतु लसीकरणाच्या ७२ तासांच्या आत मृत्यू झाल्याने मेयोत नियमानुसार शवविच्छेदन करण्यात आले.

दौलत शाहू (५८, रा. हंसापुरी खदान) असे या मृताचे नाव आहे. शाहू यांनी ३ जुलै रोजी मनपाच्या हंसापुरी केंद्रात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. परंतु दोन तासातच शाहू यांना छातीत दुखायला लागले. लागलीच त्यांना मेयोचा कॅज्युअल्टी विभागात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासल्यावर ते मृत असल्याचे घोषित केले. मेयोच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले, शाहू यांना मागील चार दिवसांपासून छातीत दुखत होते. याची माहिती त्यांनी घरी दिली होती. परंतु उपचार केले नव्हते. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हंसापुरी येथील मनपाच्या केंद्रावर लस घेतली. दोन तासानंतर त्यांना अस्वस्थ वाटून छाती दुखू लागली. त्यांच्या नातेवाइकांनी तातडीने मेयोत दाखल केले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. लसीकरणानंतर ७२ तासांच्या आत मृत्यू झाल्याने नियमानुसार व्हिडिओ शूटिंग करून व पॅथालॉजीतज्ज्ञाची मदत घेऊन शवविच्छेदन करण्यात आले.

-लसीकरणानंतर आतापर्यंत ८ मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, लसीकरणानंतर आतापर्यंत सुमारे ८ मृत्यू झाले आहेत. परंतु कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मृत्यू झाले, असे म्हणणे चुकीचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, मृत्यू झालेल्यांना विविध गंभीर आजार होते. लस घेणे आणि त्यांचा मृत्यू होणे हा योगायोग ठरला असावा; परंतु याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

Web Title: Death within two hours after vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.