नागपूरच्या ताजबाग येथील ऊर्समध्ये करंट लागू युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:20 PM2018-12-14T23:20:28+5:302018-12-14T23:21:17+5:30

ताजबाग मैदानात मृतावस्थेत सापडलेला लखनौ येथील युवकाचा करंट लागून मृत्यू झाला होता. सक्करदरा पोलिसांनी निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Death of a young man in the Urs of Tajbag by electric current | नागपूरच्या ताजबाग येथील ऊर्समध्ये करंट लागू युवकाचा मृत्यू

नागपूरच्या ताजबाग येथील ऊर्समध्ये करंट लागू युवकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देउर्स कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताजबाग मैदानात मृतावस्थेत सापडलेला लखनौ येथील युवकाचा करंट लागून मृत्यू झाला होता. सक्करदरा पोलिसांनी निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या ६ आॅक्टोबर रोजी दुपारी ताजबाग उर्स मैदानात राजू बालकराम यादव (२८) रा. उमशैली लखनौ उत्तर प्रदेश याचा मृतदेह सापडला. त्यावेळी त्याची ओळखही पटली नव्हती. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. मृताची ओळख पटल्यावर मत युवक हा आशुतोष बोधरिया ऊर्फ गोल्डी याच्याकडे काम करीत असल्याचे आढळून आले. गोल्डी ताजबाग येथे पाळणे लावण्यासाठी आला होता. राजू त्याच्याकडे काम करीत होता. उर्सचे कंत्राट मुमताज अली ऊर्फ रजा सय्यद अली (५६) ताजबाग यांना मिळाले होते. ६ आॅक्टोबर रोजी दुपारी पाळण्याचा करंट लागून राजूचा मृत्यू झाला. सक्करदरा पोलिसांनी मुमताज अली आणि आशुतोषच्या विरुद्ध निष्काळजीपणा बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: Death of a young man in the Urs of Tajbag by electric current

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.