नागपुरात दारू विक्रेत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:07 AM2019-05-17T01:07:25+5:302019-05-17T01:08:03+5:30

अवैध दारू विक्री करणाऱ्या गुंडाने बेदम मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या करण राजकुमार मेहरा (वय १९, रा. जीजामातानगर, खरबी) याचा अखेर मृत्यू झाला. यानंतर तणाव वाढल्याने आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा रंगल्याने नंदनवन पोलिसांनी गुरुवारी कुख्यात गुंड काल्या ऊर्फ शामराव सखाराम गडेरिया (वय ४५) याला अटक केली.

Death of a youth wounded in an attack by a liquor vendor in Nagpur | नागपुरात दारू विक्रेत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

नागपुरात दारू विक्रेत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देखरबीत तणाव : कुख्यात काल्याला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध दारू विक्री करणाऱ्या गुंडाने बेदम मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या करण राजकुमार मेहरा (वय १९, रा. जीजामातानगर, खरबी) याचा अखेर मृत्यू झाला. यानंतर तणाव वाढल्याने आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा रंगल्याने नंदनवन पोलिसांनी गुरुवारी कुख्यात गुंड काल्या ऊर्फ शामराव सखाराम गडेरिया (वय ४५) याला अटक केली.
करण आणि काल्या आजूबाजूला राहायचे. काल्या अनेक वर्षांपासून दारू विक्री आणि तस्करीत सहभागी आहे. त्याची या भागात मोठी दहशत आहे. ११ मेच्या सायंकाळी ६.३० वाजता करणची आई नीलम घराला टिन लावत होती. काल्याने त्याला विरोध करून नीलम तसेच परिवारातील सदस्यांना मारहाण केली. जीवे मारण्याचीही धमकी दिली. नीलम यांनी १०० नंबरवर फोन करून या घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षाने नंदनवन पोलिसांना कळविले. नंदनवन पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा काल्या पळून गेला. पोलीस जाताच तो घरी परतला आणि त्याने पुन्हा नीलम यांना शिवीगाळ केली. नीलम यांनी दिलेल्या माहितीवरून पुन्हा पोलीस पोहचले. मात्र, माहिती पडल्यासारखा काल्या आधीच तेथून सटकला. रात्री १०.३० वाजता काल्या पुन्हा घरी आला. त्याने अश्लील शिवीगाळ सुरू केल्याने करणने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी काल्याने लाकडी बल्लीने करणवर हल्ला चढवून त्याला बेदम मारहाण केली. काल्याचा मुलगाही त्यात सहभागी झाला. गंभीर जखमी झालेल्या करणला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. नंदनवन पोलिसांनी काल्यावर जुजबी गुन्हा दाखल केल्याने त्याला जामीन मिळाला. मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना बुधवारी करणला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. सोशल मीडियावर बुधवारी रात्री या प्रकरणात पोलिसांची ढिलाई चर्चेला आली. परिणामी धावपळ करून नंदनवन पोलिसांनी काल्याला हत्येच्या आरोपात अटक केली. त्याच्या अल्पवयीन दोषी मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांमुळेच गुन्हा
करण एका कपड्याच्या दुकानात काम करायचा. तो होतकरू होता. घटनेपूर्वी करणच्या आईने वारंवार नियंत्रण कक्ष आणि नंदनवन पोलिसांना काल्याच्या कुकृत्याची माहिती कळविली. पोलिसांनी दिखाव्यासाठी दोनदा धावही घेतली, मात्र काल्याच्या मुसक्या बांधल्या नाही. वेळीच काल्याला जेरबंद केले असते तर करणचा जीव वाचला असता. विशेष म्हणजे, काल्यावर दोन डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. नंदनवन ठाण्यातील काही पोलिसांसोबत त्याचे मधूर संबंध आहेत. त्याचमुळे काल्या निर्ढावला आहे. त्याने क्षुल्लक कारणावरून करणचा बळी घेतला. या प्रकरणात काल्याचे हित जपणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

 

 

Web Title: Death of a youth wounded in an attack by a liquor vendor in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.