क्षुल्लक कारणावरून वाद

By admin | Published: October 25, 2014 02:39 AM2014-10-25T02:39:12+5:302014-10-25T02:39:12+5:30

क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान प्राणघातक हल्ल्यात झाले. यात एका महिलेसह पाच जण जबर जखमी झाले.

Debate on trivial reasons | क्षुल्लक कारणावरून वाद

क्षुल्लक कारणावरून वाद

Next

नागपूर : क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान प्राणघातक हल्ल्यात झाले. यात एका महिलेसह पाच जण जबर जखमी झाले. आज दुपारी ४.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे राहुलनगर झोपडपट्टी, प्रियंकावाडी परिसरात रात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते.
या भागात असलेल्या परप्रांतीय रहिवाशांकडून लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी गौरा-गौरीचा मोठा कार्यक्रम केला जातो. विसर्जनाची मोठी मिरवणूक काढण्यात येते. आज दुपारी परिसरातील मंडळी मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाली.
तलावावर विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन तरुणांमध्ये बाचाबाची झाली. उपस्थितांनी त्यावेळी दोघांनाही समज दिल्याने वाद टळला. त्यानंतर ही मंडळी राहुलनगर झोपडपट्टीत पोहचली. त्यांच्या मागोमाग १५ ते २० जण तलवार, रॉड आणि काठ्या घेऊन आले. त्यांनी सुनील लड्डूराम यादव याच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या मदतीला धावलेल्या वेणूबाई देवगीरकर, उमेश वानखेडे, राजन सोनवणे आणि संजू मडावी यांनाही आरोपींनी जोरदार मारहाण केली. त्यामुळे ते जबर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.
जखमींना तातडीने साई मंदिराजवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनाही कळविण्यात आले. त्यानुसार, धंतोलीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींकडून घटनेची माहिती घेतली. दरम्यान, रात्री ७ च्या सुमारास जखमींचे समर्थक मोठ्या संख्येत धंतोली ठाण्यात पोहचले. त्यांनी आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
पोलिसांनी आरोपी सोनू कनोजिया, विशाल शंभरकर, राकेश पाटील, पराग, नितीन तराळे, सारंग, इरफान, समशेर, जमशेद, मिलिंद, धर्मेंद्र, लड्डू पठाण आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे रात्रीपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)

Web Title: Debate on trivial reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.