अनधिकृत ले-आऊटधारकांकडून लोकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:12 AM2021-09-17T04:12:17+5:302021-09-17T04:12:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरालगतच्या भागात तसेच ग्रामीण भागात कृषक जमिनीवर अनधिकृत ले-आऊट टाकून बिल्डर वा ले-आऊटधारकांकडून लोकांची ...

Deception of people by unauthorized layout holders | अनधिकृत ले-आऊटधारकांकडून लोकांची फसवणूक

अनधिकृत ले-आऊटधारकांकडून लोकांची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरालगतच्या भागात तसेच ग्रामीण भागात कृषक जमिनीवर अनधिकृत ले-आऊट टाकून बिल्डर वा ले-आऊटधारकांकडून लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. कामठी परिसरात हजारो लोकांनी अशा ले-आऊटमधील भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ले-आऊटधारकांकडून विविध प्रकारचे आमिष दाखविले जाते. प्रत्यक्षात रस्ते, पाणी, सिवरेज, मैदान, सार्वजनिक वापराची जागा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही. लोकांची फसवणूक केली जाते. कामठी परिसरात ३४२ अनधिकृत ले-आऊट मधील हजारो भूखंडांची विक्री करण्यात आली आहे. यासंदर्भात नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (नामप्रविप्रा) सुनावणी सुरू आहे. अडीच हजराहून अधिक ले-आऊट धारकांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.

...

अनधिकृत भूखंड खरेदी करू नका

नामप्रविप्रा कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकाना, अभिन्यास धारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ अंतर्गत नोटीस तामिल करण्यात येत आहे. अनधिकृत ले-आऊट पाडून त्यातील भूखंड विक्री करणे व भूखंड घेणे हा दखल पात्र गुन्हा आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्याची कार्यवाही केली जाते. त्यामुळे नागरिकांनी मंजूर व अधिकृत ले-आऊटमधीलच घरे, भूखंड खरेदी करावे. असे आवाहन नामप्रविप्राने केले आहे.

...

अधिकृत ले-आऊटमधीलच घरे खरेदी करा

मंजूर व अधिकृत ले-आऊटमधीलच भूखंड वा घरे खरेदी करून लोकांनी आपली फसवणूक टाळावी. अनधिकृत ले-आऊटमध्ये नागरिकांना पाणी, वीज, सिवरेज, रस्ते, एसटीपी अशा मुलभूत सुविधा मिळत नाही. भविष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. अधिकृत ले-आऊटची माहिती नासुप्र व नामप्रविप्राच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच या संदर्भात उपनिबंधक कार्यालयांनाही सूचना दिलेल्या आहेत.

-मनोजकुमार सूर्यवंशी, नासुप्र सभापती व महानगर आयुक्त

Web Title: Deception of people by unauthorized layout holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.