१० लाख रुपये भरपाई देण्यावर निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:07 AM2021-02-10T04:07:58+5:302021-02-10T04:07:58+5:30

मोकाट गाईमुळे अपघात होऊन व्यावसायिकाचा मृत्यू नागपूर : मोकाट गाईमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या वारसदारांना १० लाख ...

Decide to pay Rs 10 lakh | १० लाख रुपये भरपाई देण्यावर निर्णय घ्या

१० लाख रुपये भरपाई देण्यावर निर्णय घ्या

Next

मोकाट गाईमुळे अपघात होऊन व्यावसायिकाचा मृत्यू

नागपूर : मोकाट गाईमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या वारसदारांना १० लाख रुपये भरपाई अदा करण्यावर आठ आठवड्यामध्ये कायद्यानुसार निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना दिला. तसेच, संबंधित निर्णयाची माहिती वारसदारांना कळविण्यास सांगितले.

रामकुमार रामखिलनानी (४६) असे मृताचे नाव असून, भरपाईकरिता त्यांची पत्नी सिमरन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांनी सदर आदेश देऊन ती याचिका निकाली काढली. रामकुमार हे २० जुलै २०१८ रोजी स्कूटर चालवत असताना गिट्टीखदान रोडवर एक मोकाट गाय अचानक आडवी आली. त्यांच्या स्कूटरची गाईला धडक बसली. त्यामुळे रामकुमार रोडवर कोसळून गंभीर जखमी झाले. २६ जुलै रोजी मेयो रुग्णालय येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते जरीपटका येथे किराणा दुकान चालवीत होते. त्या दुकानावर त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण अवलंबून होते. त्यांना अल्पवयीन मुलगी व मुलगा आहे. कायद्यानुसार, मोकाट जनावरामुळे अपघात झाल्यास जबाबदार प्राधिकरणाने भरपाई देणे आवश्यक आहे, असे सिमरन यांचे म्हणणे होते. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. शिल्पा गिरटकर यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Decide to pay Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.