उद्योगांच्या वीजदरावर लवकरच निर्णय

By admin | Published: February 29, 2016 03:02 AM2016-02-29T03:02:13+5:302016-02-29T03:02:13+5:30

मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया परिषदेत विदर्भ मराठवाड्यात दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Decision on the power of industries soon | उद्योगांच्या वीजदरावर लवकरच निर्णय

उद्योगांच्या वीजदरावर लवकरच निर्णय

Next

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती : व्हीआयएच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
नागपूर : मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया परिषदेत विदर्भ मराठवाड्यात दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. येथील उद्योगांच्या विकासासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या वीजदरावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.
उद्योग भवनात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक विस्तारीत दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार अजय संचेती, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे होते.
विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांना द्यायच्या वीजदराबाबत नेमलेल्या समितीच्या अहवालावर लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. प्रशासकीय कार्यपद्धती सरळसोपी करून विविध शासकीय परवाने आॅनलाईन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.
येत्या चार महिन्यात ही सेवा प्रभावीपणे काम करेल, असे त्यांनी सांगितले. यापुढे सर्व परवानग्या आॅनलाईन पुरविण्यात येईल. यासाठी मैत्री अंतर्गत एक खिडकी योजना प्रभावीपणे काम करेल.
उद्योगातील अडचणी सोडविण्यासाठी उद्योग संघटना सकारात्मक सहकार्य करीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रारंभी व्हीआयचे उपाध्यक्ष अनिल पारख यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी माजी अध्यक्ष प्रवीण तापडिया यांनी विदर्भातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. संचालन व्हीआयएचे सचिव रोहित अग्रवाल यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Decision on the power of industries soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.