कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:08 AM2021-09-25T04:08:45+5:302021-09-25T04:08:45+5:30

नागपूर : कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत शुक्रवारी पुन्हा घसरण झाली. शहरात ५ तर जिल्हाबाहेरील २ अशा ७ रुग्णांची नोंद झाली. ...

Decline in coronary artery disease | कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण

कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण

Next

नागपूर : कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत शुक्रवारी पुन्हा घसरण झाली. शहरात ५ तर जिल्हाबाहेरील २ अशा ७ रुग्णांची नोंद झाली. सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे ८३ रुग्ण सक्रिय आहेत. यातील ५९ रुग्ण शहरातील, २२ रुग्ण ग्रामीणमधील तर २ रुग्ण जिल्हाबाहेरील आहेत.

नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत ५,१०९ चाचण्या झाल्या. यात शहरातील ३,८९६ तर ग्रामीण भागातील १२१३ आहेत. शहरात आतापर्यंत ७,९४,४५९ चाचण्यांमधून ३,४०,२३८ रुग्ण पॉझिटिव्ह तर ५,८९३ रुग्णांचा जीव गेला आहे. ग्रामीणमध्ये ५,०८,३४१ चाचण्यांमधून १,४६,१६९ बाधित रुग्णांची नोंद झाली असून २,६०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात आज बाधितांच्या तुलनेत दुप्पट, १५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८३,०४७ झाली असून याचे प्रमाण ९७.९३ टक्के आहे. सध्याच्या स्थितीत सक्रिय असलेल्या कोरोनाच्या ८३ रुग्णांमध्ये मेडिकलमध्ये ९, एम्समध्ये १३, आमदार निवासात ३२ तर उर्वरित रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ५,१०९

शहर : ५ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,९३,२५०

ए. सक्रिय रुग्ण :८३

ए. बरे झालेले रुग्ण : ४,८३,०४७

ए. मृत्यू : १०,१२०

Web Title: Decline in coronary artery disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.