सलग १४व्या दिवशी रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:07 AM2021-05-15T04:07:54+5:302021-05-15T04:07:54+5:30

नागपूर : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कोरोना रुग्णसंख्येतील घट सलग १४ व्या दिवशी कायम होती. विशेष म्हणजे, १२ ...

Decline in number of patients for 14th consecutive day | सलग १४व्या दिवशी रुग्णसंख्येत घट

सलग १४व्या दिवशी रुग्णसंख्येत घट

Next

नागपूर : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कोरोना रुग्णसंख्येतील घट सलग १४ व्या दिवशी कायम होती. विशेष म्हणजे, १२ मार्चनंतर म्हणजे, दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या दोन हजाराखाली आली. शुक्रवारी १९९६ रुग्णांची नोंद झाली. परंतु मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. आज ७० रुग्णांचे मृत्यू झाले. जिल्ह्यात रुग्णांची एकूणच संख्या ४,६०,६०० झाली असून मृतांची संख्या ८,४७२ वर पोहचली आहे.

कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० पासून सुरू झाली. सप्टेंबर महिन्यात ती उच्चांकावर होती. ऑक्टोबर महिन्यापासून ही लाट ओसरू लागली. त्यानंतर तीन महिने ५००च्या खाली रुग्णसंख्या होती. परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढायला लागली. मार्च महिन्यात कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे शासनाने घोषित केले. एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद झाली. मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. १ मे रोजी सहा हजारावर असलेली रुग्णसंख्या ३ मे रोजी पाच हजाराखाली आली. ८ मे रोजी चार हजाराखाली, १० मे रोजी तीन हजाराखाली तर १४ मे रोजी दोन हजाराखाली आली. आज १४,१५१ चाचण्या झाल्या असून ‘पॉझिटिव्हीटी’चा दर १४ टक्क्यांवर आला. ४९६५ रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी वाढून ८९ टक्क्यांवर गेली आहे.

-शहरात ११३२ तर ग्रामीणमध्ये ८५१ रुग्ण

शहरात आज १०,८८९ चाचण्यामधून ११३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले व ३५ रुग्णांचे मृत्यू झाले. ग्रामीणमध्ये ३२६२ चाचण्यांमधून ८५१ रुग्णांची नोंद झाली तर २२ रुग्णांचे जीव गेले. जिल्हाबाहेरील १३ रुग्ण व तेवढ्याच रुग्णांचे मृत्यू झाले.

-८०३४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार

नागपूर जिल्ह्यातील शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ८०३४ रुग्ण उपचार घेत आहेत. ३१,०२२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. एकूण ३९,०५६ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरात १८,७५९ तर ग्रामीणमध्ये २०,२९७ रुग्ण आहेत.

:: रुग्णसंख्येतील घट

१ मे : ६५७६ रुग्ण

२ मे ५००७ रुग्ण

३ मे ४९८७ रुग्ण

८ मे ३८२७ रुग्ण

१० मे २५३० रुग्ण

१४ मे १९९६ रुग्ण

:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती

दैनिक चाचण्या: १४,१५१

ए. बाधित रुग्ण :४,६०,६००

सक्रिय रुग्ण : ३९,०५६

बरे झालेले रुग्ण :४,१३,०७२

ए. मृत्यू : ८,४७२

Web Title: Decline in number of patients for 14th consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.