एनएमसीतून निवृत्त वडिल अन् मुलाचा कुजलेला मृतदेह आढळला

By दयानंद पाईकराव | Published: June 1, 2024 06:01 PM2024-06-01T18:01:52+5:302024-06-01T18:02:53+5:30

गुलमोहरनगरात खळबळ : दोन दिवसांपूर्वी झाला दोघांचा मृत्यू, दुर्गंधी येत असल्याने घटना उघडकीस

Decomposed bodies of retired father and son found in NMC | एनएमसीतून निवृत्त वडिल अन् मुलाचा कुजलेला मृतदेह आढळला

Decomposed bodies of retired father and son found in NMC

नागपूर : महापालिकेतून निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेल ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या ३९ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गुलमोहरनगर येथील त्यांच्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे शनिवारी खळबळ उडाली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

शिवदास पांडुरंग भेंडे (७०) आणि हरिष शिवदास भेंडे (३९) दोघे रा. प्लॉट नं. ८९, मा गंगा हाऊसिंग सोसायटी, गल्ली नं. ३, गुलमोहरनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत. यात शिवदास यांचा मृतदेह बाथरुममध्ये तर हरिषचा मृतदेह सोफ्यावर बसलेल्या अवस्थेत आढळला. कळमना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास हे महापालिकेतून निरीक्षक पदाहून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना मिळत असलेल्या पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. त्यांना हृदयविकार होता. तसेच ग्लुकोमामुळे त्यांना फारसे दिसत नव्हते. तर त्यांचा मुलगा हरिष याला दारुचे व्यसन होते. तो कुठलाच कामधंदा करीत नव्हता.

भेंडे यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजाºयांनी कळमना पोलिसांना याबाबत सुचना दिली. कळमनाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुळ महाजन, सहायक पोलिस निरीक्षक दंडवते आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेथे उपस्थित असलेला शिवदास यांचा लहान मुलगा रोशन याने पोलिसांना मृतक हे आपले वडिल व लहान भाऊ असल्याची माहिती दिली. त्यांचा कोणासोबतही वाद नसून त्यांच्या मृत्यूबाबत आपणास काहीही माहित नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी रोशन शिवदास भेंडे (४४, रा. सत्यमनगर कापसी खुर्द बिडगाव) यांच्या सुचनेवरून कलम १७४ नुसार गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. पुढील तपास कळमना पोलिस करीत आहेत.

Web Title: Decomposed bodies of retired father and son found in NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.