कोरोनावर्षात मुलींच्या जन्म टक्केवारीत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 06:32 AM2021-06-28T06:32:06+5:302021-06-28T06:32:53+5:30

मुलांच्या प्रमाणात ९४ टक्क्यांहून कमी जन्म

Decrease in the birth rate of girls in Corona | कोरोनावर्षात मुलींच्या जन्म टक्केवारीत घट

कोरोनावर्षात मुलींच्या जन्म टक्केवारीत घट

Next
ठळक मुद्देमाहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या २०११ सालापासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता ही बाब लक्षात आली आहे.

योगेश पांडे

नागपूर : उपराजधानी नागपुरात मुलींचा जन्मदर परत एकदा घटला आहे. २०१९ साली मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची टक्केवारी नऊ वर्षांत प्रथमच ९५ टक्क्यांच्या वर गेली होती. मात्र, कोरोना वर्षात मुलींच्या जन्माची टक्केवारी ९४ टक्क्यांच्या खाली आली. २०११ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता एकूण जन्माचे प्रमाणदेखील कमी झाल्याचे दिसून येत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या २०११ सालापासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता ही बाब लक्षात आली आहे. २०२० साली २३ हजार २२८ मुलांचा जन्म झाला व मुलींच्या जन्माचा आकडा २१ हजार ७५० इतका होता. मुलींच्या जन्माची टक्केवारी ९३.६४ टक्के इतकी होती. २०१९ साली हीच टक्केवारी ९५.२९ टक्के इतकी होती. २०११ साली शहरात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची टक्केवारी ९३.२६ टक्के इतकी होती. २०१५ साली ही टक्केवारी ९४.२२ तर २०१८ साली ९४.२४ टक्के इतक्यावर पोहोचली. २०१६ सालानंतर प्रथमच मुलींच्या जन्माची टक्केवारी ९३.६५ टक्क्यांच्या खाली गेली.

दरम्यान, २०२१ वर्षातील सुरुवातीच्या चार महिन्यांत शहरात ८ हजार ८७९ बालकांचा जन्म झाला. त्यात ४ हजार ५५९ मुले व 
४ हजार ३२० मुलींचा समावेश होता. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची टक्केवारी ९४.७६ टक्क्यांवर आली होती.

Web Title: Decrease in the birth rate of girls in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.