विदर्भात रुग्णसंख्येत घट, मृत्यूचे प्रमाण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 10:33 PM2020-10-12T22:33:44+5:302020-10-12T22:37:40+5:30
Corona Virus , Vidarbha News विदर्भात कोरोनाबाधितांचा वेगाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. परंतु मृत्यूचे सत्र कायम आहे. सोमवारी मागील दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली. १,१८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र ५२ रुग्णांचे जीव गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांचा वेगाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. परंतु मृत्यूचे सत्र कायम आहे. सोमवारी मागील दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली. १,१८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र ५२ रुग्णांचे जीव गेले. रुग्णांची एकूण संख्या १,६८,७१५ तर मृतांची संख्या ४,५७७वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक वाढ झालेल्या अकोला जिल्ह्यात आज केवळ तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले.
नागपूर जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत आज रुग्ण व मृत्यूच्या संख्येत वाढ झाली. ५६८ रुग्ण व ३० मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ८७,२३० तर मृतांची संख्या २,८२० वर पोहचली. चंद्रपूर जिल्ह्यात १५६ नव्या रुग्णांची भर पडली. बाधितांची संख्या १२,२३३ झाली. तीन रुग्णांच्याा मृत्यूने मृतांची संख्या १८७वर गेली. गडचिरोली जिल्ह्यात ७१ रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णसंख्या ४,०३८ झाली. भंडारा जिल्ह्यात पाच रुग्णांचे बळी व ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ६८४४ तर मृतांची संख्या १७० झाली. वर्धा जिल्ह्यात सहा मृत्यू व ३६ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या ५४४७ झाली असून मृतांची संख्या १६७वर पोहचली. गडचिरोली जिल्ह्यात ७१ बाधित रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ४०३८ झाली. गोंदिया जिल्ह्यात ६५ रुग्ण व एका रुग्णाचा बळी गेला. बाधितांची संख्या ७९२१ तर मृतांची संख्या १०८ झाली. वाशिम जिल्ह्यात ६६ रुग्ण व तीन मृत्यूची भर पडली. बुलडाणा जिल्ह्यात ३३ रुग्ण आढळून आले. अमरावती जिल्ह्यात २३ रुग्ण व दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यात ११ पॉझिटिव्ह तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात तीन रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला.