सहा दिवसात पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:07 AM2020-12-07T04:07:13+5:302020-12-07T04:07:13+5:30

नागपूर : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला कोरोना पॉझिटिव्हचा दर १०.३५ टक्के होता, रविवारी हा दर ७.४४ टक्क्यावर आला. यामुळे ...

Decreased positivity in six days | सहा दिवसात पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी

सहा दिवसात पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी

Next

नागपूर : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला कोरोना पॉझिटिव्हचा दर १०.३५ टक्के होता, रविवारी हा दर ७.४४ टक्क्यावर आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी ३०८ नव्या रुग्णांची भर पडली, तर १० रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या १,१४,५२६ झाली असून, मृतांची संख्या ३,७३५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, दैनंदिन रुग्णवाढीच्या तुलनेत आज त्यापेक्षा जास्त ४१६ रुग्ण बरे झाले.

नागपूर जिल्ह्यात १ डिसेंबरला ४,९७२ चाचण्या करण्या आल्या. यात ५१५ रुग्ण आढळले होते. त्यावेळी पॉझिटिव्हीटीचे प्रमाण १०.३५ टक्के होते. २ डिसेंबर रोजी ५,५१३ चाचण्या झाल्या. यात ४५३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्हीटीचा दर ८.२१ टक्के होता. ३ डिसेंबर रोजी सर्वाधिक ६,६११ चाचण्या झाल्या. यात ५३६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हीटीचा दर ८.१० टक्के होता. ४ डिसेंबर रोजी ५,०९६ चाचण्यातून ४२२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हीटीचा दर ८.२८ होते. ५ डिसेंबर रोजी ५२०७ चाचण्यांमधून ५२७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हीटीचा दर वाढून १०.१२ टक्क्यावर गेला होता. परंतु रविवारी हा दर ७.४४ टक्क्यावर आला आहे. कमी चाचण्यांमुळे रुग्णांच्या संख्येतही घट आल्याचे बोलले जात आहे.

-शहरातील २३८ तर ग्रामीणमधील ६६ रुग्ण

आज ३,६६६ आरटीपीसीआर तर ४६९ रॅपिड ॲन्टिजेन चााचण्या करण्यात आल्या. यात शहरातील २३८, ग्रामीणमधील ६६ तर जिल्हाबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ६, ग्रामीणमधील १ तर जिल्हाबाहेरील ४ मृत्यू आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,०५,१५४ झाली आहे. ५,६३७ रुग्ण उपचाराखाली आहेत. डॉक्टरांच्या मते, दैनंदिनमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे.

::कोरोनाची आजची स्थिती

-दैनिक संशयित : ४,१३५

-बाधित रुग्ण : १,१४,५२६

_-बरे झालेले : १,०५,१५४

- उपचार घेत असलेले रुग्ण : ५,६३७

- मृत्यू : ३,७३५

Web Title: Decreased positivity in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.