दीपक बजाजला सर्वोच्च न्यायालयातही दणका

By admin | Published: November 3, 2015 03:20 AM2015-11-03T03:20:53+5:302015-11-03T03:20:53+5:30

भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमविणारा जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा

Deepak Bajaj is also in the Supreme Court | दीपक बजाजला सर्वोच्च न्यायालयातही दणका

दीपक बजाजला सर्वोच्च न्यायालयातही दणका

Next

नागपूर : भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांची अपसंपदा जमविणारा जरीपटक्यातील सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव व महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचा मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाजला सर्वोच्च न्यायालयातही दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी बजाजला अटकपूर्व जामीन नाकारून १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जरीपटका पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुरुवातीला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांनी बजाजचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १४ आॅक्टोबर रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनीही त्याला दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी बजाजने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. बजाज हा पदाचा दुरुपयोग करून सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून विविध शुल्क वसूल करीत होता. त्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची नोकरी देण्याकरिता लाखो रुपये घेतले आहेत. यामुळे २४ सप्टेंबर २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बजाजचे निवासस्थान, शाळा, कार्यालय व इतर ठिकाणी धाड टाकली. दरम्यान, अधिकाऱ्यांना १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख व २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किंमतीचे घरगुती सामान अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किंमतीची मालमत्ता आढळून आली. पथकाने २९ सप्टेंबर रोजी सोसायटीचे कार्यालय व सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाची झडती घेतली असता गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली. २६ सप्टेंबर रोजी जरीपटका पोलिसांनी बजाजविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३ (२),१३ (१)(ड) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी

Web Title: Deepak Bajaj is also in the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.