दीपाली चव्हाण यांनी अत्याचारकर्त्याला धडा शिकवायला हवा होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:17+5:302021-03-28T04:08:17+5:30

आत्महत्येमुळे व्यवस्था बदलणार नाही : वाघमारे संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे म्हणाले, आपल्या व्यवस्थेत नोकरी करणे स्त्रियांसाठी किती कठीण आहे, ...

Deepali Chavan wanted to teach a lesson to the oppressor | दीपाली चव्हाण यांनी अत्याचारकर्त्याला धडा शिकवायला हवा होता

दीपाली चव्हाण यांनी अत्याचारकर्त्याला धडा शिकवायला हवा होता

Next

आत्महत्येमुळे व्यवस्था बदलणार नाही : वाघमारे

संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे म्हणाले, आपल्या व्यवस्थेत नोकरी करणे स्त्रियांसाठी किती कठीण आहे, हे दीपालीच्या आत्महत्येवरून समजते. ही व्यवस्था पाहता सगळं सिद्ध होऊन दोषींना शिक्षा होईलच, याची खात्री देणे कठीण आहे. त्यामुळे दीपालीने मनाचा खंबीरपणा दाखवायला हवा होता. स्वत:वर झाडण्यापेक्षा बंदुकीची नोक त्या नराधमावर का रोखली नाही किंवा नोकरीवरच का लाथ मारली नाही, असेही आता वाटते. हे प्रश्न अप्रस्तुत असले तरी महत्त्वाचे आहेत. किमान स्वावलंबी महिलांनी स्वत:ला संपविण्यापेक्षा पुरुषी अत्याचाराला आव्हान द्यावे. अगदी टोकाची परिस्थिती तयार झाली तरी स्वत:ला संपविण्याऐवजी अत्याचाराला संपविणे अधिक न्याय्य आहे. एखाद्यामुळे तुमचे जगणे असह्य होत असेल तर त्याला धडा शिकवा, हेच मुलींना सांगण्याची आज गरज आहे.

महिला कर्मचाऱ्यांबाबत वनविभाग गंभीर नाही : पारसकर

वनविभागात वनरक्षक, वनपाल आदी पदांवर अनेक महिला कार्यरत आहेत. फिल्डवर काम करताना या महिलांना जंगलात फिरताना अडचणींचा सामना करावा लागतो. पुरुष अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. वनविभागातील महिला तक्रार निवारण समितीत अनेक तक्रारी दाखल होत असतात. वन विभागातील महिला तक्रार निवारण समिती काय करते, याचा तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. वनविभागातील महिला तक्रार निवारण समितीने गेल्या १२ वर्षांत योग्य कामगिरी केली नाही. समितीत अनेक महिलांच्या तक्रारी येतात. पण एकाही अधिकाऱ्याला शिक्षा झाली नाही व एकाही पीडितेला न्याय मिळाला नाही. त्यामुळे राज्य महिला आयोगाने या प्रकरणात जातीने लक्ष घालून वनविभागतील महिला तक्रार निवारण समितीत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तात्काळ निकाल लावावा, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाला वूई-४ चेंज संघटनेतर्फे डॉ. रश्मी पारसकर, डी. योगिता, सुजाता लोखंडे, प्रा. दीपाली मेश्राम, रश्मी पदवाड मदनकर, अलका वेखंडे यांनी केली.

Web Title: Deepali Chavan wanted to teach a lesson to the oppressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.