दीपक बजाजविरुद्ध आरोप निश्चित

By admin | Published: July 27, 2016 02:42 AM2016-07-27T02:42:17+5:302016-07-27T02:42:17+5:30

कोट्यवधीच्या अपसंपदेप्रकरणी जरीपटका येथील महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. दीपक खुबचंद बजाज

Defamation charges against Deepak Bajaj | दीपक बजाजविरुद्ध आरोप निश्चित

दीपक बजाजविरुद्ध आरोप निश्चित

Next

कोट्यवधीच्या अपसंपदेचे प्रकरण : पुन्हा जामीन अर्ज दाखल
नागपूर : कोट्यवधीच्या अपसंपदेप्रकरणी जरीपटका येथील महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. दीपक खुबचंद बजाज आणि त्यांची पत्नी वीणा बजाज यांच्याविरुद्ध मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. सध्या न्यायालयीन कोठडीत कारागृहात असलेले बजाज यांनी पुन्हा जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
२४ सप्टेंबर २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड घातली असता दीपक बजाज यांचे साईकृपा प्रिन्सिपाल बंगलो नावाचे निवासस्थान, शाळा कार्यालय, सोसायटी कार्यालय आणि इतर परिसराच्या झडतीत १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख आणि २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किमतीचे घरगुती सामान, अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किमतीची स्थावर व जंगम मालमत्ता आढळून आली होती. २६ सप्टेंबर २०१५ रोजी जरीपटका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२९ सप्टेंबर रोजी पुन्हा सिंधु एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय, सिंधु एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय तसेच कार्यालय परिसरातील प्रिंटिंग प्रेसचे पुरावे गोळा करण्याच्या हेतूने झडती घेतली असता, पतसंस्थेच्या गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती.
दीपक बजाज यांना १२ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. २६ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली. तेव्हापासून ते कारागृहात आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास पूर्ण करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३(२), भादंविच्या ३४, १२० (ब), १६८, १९३, २०१, ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४६७, ४७१ कलमांतर्गत दीपक बजाज आणि त्यांच्या पत्नी वीणा दीपक बजाज यांच्याविरुद्ध ८ फेब्रुवारी २०१६ रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील गिरीश दुबे आणि आरोपीच्यावतीने अ‍ॅड. रजनीश व्यास काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Defamation charges against Deepak Bajaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.