क्षेत्ररक्षणातील अपयशामुळे पराभव : हरभजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:06 AM2020-11-29T04:06:52+5:302020-11-29T04:06:52+5:30

तो म्हणाला,‘अनेक गोष्टी पराभवास कारणीभूत ठरल्या. क्षेत्ररक्षण गचाळ झाले, अनेक झेल सुटले, अनावश्यक धावा मोजल्या आणि टप्प्याटप्प्यात आम्ही खेळ ...

Defeat due to failure in fielding: Harbhajan | क्षेत्ररक्षणातील अपयशामुळे पराभव : हरभजन

क्षेत्ररक्षणातील अपयशामुळे पराभव : हरभजन

Next

तो म्हणाला,‘अनेक गोष्टी पराभवास कारणीभूत ठरल्या. क्षेत्ररक्षण गचाळ झाले, अनेक झेल सुटले, अनावश्यक धावा मोजल्या आणि टप्प्याटप्प्यात आम्ही खेळ केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर झेल सोडणे किती महागडे ठरते, हे काल पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकांचा पाठिंबा मिळणार नसेल तर गोलंदाज हताश होतात. माझ्या मते, मोहम्मद शमीचा अपवाद वेगळता सर्वच खेळाडूंसाठी कालचा दिवस अपयशी ठरला.’ ऑस्ट्रेलियात उसळी घेणारे चेंडू खेळण्याची सवय लावून घ्यावी लागेल. दुसरीकडे आमच्या गोलंदाजांना येथे पूर्ण टप्प्याचे चेंडू टाकावे लागतील. आखूड टप्प्याचे चेंडू टाकले की धावा मोजाव्या लागतील, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे, असे हरभजनने एका वाहिनीशी बोलताना सांगितले.

Web Title: Defeat due to failure in fielding: Harbhajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.