विमानाला विलंब, नागपुरात प्रवाशांचा गोंधळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:59 AM2019-11-12T00:59:02+5:302019-11-12T00:59:46+5:30

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री विमानाला विलंब झाल्याने प्रवाशांनी गोंधळ केला. ‘गो एअर’च्या विमानाला उशीर झाल्याने हा गोंधळ झाला.

Delay of aircraft, commuters' chaos in Nagpur | विमानाला विलंब, नागपुरात प्रवाशांचा गोंधळ 

विमानाला विलंब, नागपुरात प्रवाशांचा गोंधळ 

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री विमानाला विलंब झाल्याने प्रवाशांनी गोंधळ केला. ‘गो एअर’च्या विमानाला उशीर झाल्याने हा गोंधळ झाला.
‘गो एअर’चे विमान क्रमांक २६०२ नागपूर-मुंबईला जवळपास तीन तासांचा उशीर झाला. याची माहिती प्रवाशांना देण्यात आली तर ते संतप्त झाले. विलंबाचे कारणदेखील स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे नाराज प्रवाशांनी ‘एअरलाईन्स’च्या कर्मचाऱ्यांवर राग काढला. या विमानात नागपूरहून मुंबईला जाणारे १७४ प्रवासी होते.

इंजिनमध्ये होती समस्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या इंजिनमध्ये काही तरी समस्या निर्माण झाली होती. तर विमानतळाच्या अधिकृत सूत्रांनुसार ‘ऑपरेशनल’ कारणांमुळे विमानाला विलंब झाला. मुंबईत धावपट्टीचे काम सुरू असल्याने विमानाला उशीर झाला असेदेखील काही जणांनी सांगितले. दरम्यान रात्री ८ वाजेनंतर विमान मुंबईकडे रवाना झाले.

आठ विमानांना विलंब
सोमवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या  व येथून उड्डाण भरणाºया एकूण आठ विमानांना विलंब झाला. इंडिगो एअरलाईन्सचे ६ई-२८४ पुणे-नागपूर रात्री १२.५५ ऐवजी २.३७ वाजता आले. तर ६ई-३१२ बेंगळुरू-नागपूर रात्री ८.४० ऐवजी रात्री ९.२० वाजता आले. ६ई-४०३ मुंबई-नागपूर विमान दुपारी चार ऐवजी ५.२५ वाजता ‘लॅन्ड’ झाले. तर ‘गो एअरलाईन्स’चे जी८-२५१९ दिल्ली-नागपूर विमान सायंकाळी ७.२० ऐवजी रात्री ८.४५ ला पोहोचले.
तर जी८-८११ नागपूर-बंगळुरू विमान सकाळी ६ ऐवजी ९ वाजता रवाना झाले. ६ई-३१७ नागपूर-बंगळुरू विमान सकाळी १०.५० ऐवजी १२.०५ ला गेले. ६ई-५७१ नागपूर-चेन्नई विमान दुपारी १.३० ऐवजी दुपारी २.५८ ला रवाना झाले. तर ‘गो एअरलाईन्स’चे २५२० नागपूर-दिल्ली विमान रात्री ९.२५ ऐवजी रात्री १०.५० ला उडाले.

Web Title: Delay of aircraft, commuters' chaos in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.