मनपा विद्यार्थ्यांना टॅब देण्यात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:08 AM2021-03-24T04:08:02+5:302021-03-24T04:08:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपाच्या शाळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी तातडीने टॅब उपलब्ध करण्याला मंजुरी दिली. परंतु ...

Delay in giving tabs to Corporation students | मनपा विद्यार्थ्यांना टॅब देण्यात दिरंगाई

मनपा विद्यार्थ्यांना टॅब देण्यात दिरंगाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपाच्या शाळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी तातडीने टॅब उपलब्ध करण्याला मंजुरी दिली. परंतु १ जानेवारी रोजी निविदा काढूनही निविदा समितीच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी अजूनही टॅबपासून वंचित आहेत. तीन दिवसात टॅब उपलब्ध झाले नाही तर या प्रकरणाची चौकशी करून निविदा समितीतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी मंगळवारी समितीच्या बैठकीत दिले.

मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे सोयीचे यासाठी टॅब खरेदी प्रक्रिया लवकर व्हावी, यासाठी शिक्षण समिती आग्रही होती. परंतु निविदा समितीच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना टॅब मिळाले नाही, तीन दिवसात टॅब उपलब्ध झाले नाही तर हा विषय महासभेपुढे ठेवण्यात यावा आणि दोषीवर कारवाई करण्यात यावी, असा ठराव बैठकीत पारित करण्यात आला. बैठकीत ऑनलाईन शिक्षणासोबतच गणवेश वाटपाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.

...

इंग्रजी शाळांची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा!

नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदार संघात सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील अहवाल शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी मांडला. यासंबंधीची संपूर्ण कार्यवाही ३१ मार्चपर्यंत पूर्ण करून पुढील शैक्षणिक सत्रापासून या सहाही शाळा सुरू व्हाव्यात, यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिवे यांनी दिले.

..

त्या शिक्षिकेला दोन वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव

सुरेंद्रगड हिंदी उच्च माध्यमिक शाळेतील दोन विद्यार्थीनीवर अथक परिश्रम घेत त्यांना आणि पर्यायाने नागपूर मनपाला आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांना दोन वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव आमसभेकडे पाठविण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

Web Title: Delay in giving tabs to Corporation students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.