गणेशपेठ बसस्थानकापासून खासगी ट्रॅव्हल्सना हटविले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:11 AM2021-09-14T04:11:09+5:302021-09-14T04:11:09+5:30
नागपूर : प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या मागणीनुसार वाहतूक विभागाने गणेशपेठ बसस्थानकाच्या आजूबाजूला २०० मीटर ...
नागपूर : प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या मागणीनुसार वाहतूक विभागाने गणेशपेठ बसस्थानकाच्या आजूबाजूला २०० मीटर अंतरापर्यंत खासगी ट्रॅव्हल्स व इतर वाहनांना हटविण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे एसटी बसस्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ५ टक्क्यांनी वाढली आहे.
वाहतूक पोलिसांनी जवळपास दोन आठवड्यांपूर्वी गणेशपेठ बसस्थानकाच्या आजूबाजूला कारवाई सुरू केली आहे. यामुळे एसटीचे प्रवासी पळविणारे दलाल दूर झाले आहेत. रक्षाबंधनात प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे आणि मध्यप्रदेशातील फेऱ्या सुरू झाल्यामुळे एसटीच्या ८० टक्के बसेस सुरू झाल्या आहेत. तर पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रवाशांची संख्याही वाढली आहे. पूर्वी बसस्थानकाला लागून खासगी बसेस उभ्या करून दलाल एसटीचे प्रवासी पळवित होते. परंतु आता खासगी ट्रॅव्हल्सला दूर पाठविल्यामुळे प्रवासी सामानासह २०० मीटर दूर जाऊ इच्छित नसल्याची स्थिती आहे.
...........
नियमाची केली अंमलबजावणी
‘वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त लावला असून नो पार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
.........