दिल्ली-नागपूरची उड्डाणे प्रभावित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:27 PM2019-05-30T12:27:25+5:302019-05-30T12:28:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शपथग्रहण समारंभात विदेशी पाहुण्यांसह हजारोंच्या संख्येत मान्यवर येणार आहेत. त्याचा परिणाम नागपुरातून दिल्ली जाणाºया विमानांच्या उड्डाणांवर होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शपथग्रहण समारंभात विदेशी पाहुण्यांसह हजारोंच्या संख्येत मान्यवर येणार आहेत. त्याचा परिणाम गुरुवार, ३० मे रोजी नागपुरातून दिल्ली जाणाºया विमानांच्या उड्डाणांवर होण्याची शक्यता आहे. दिल्लीत शपथग्रहण समारंभात उपस्थित राहण्यासाठी विदेशातून अनेक गणमान्य चार्टर विमानांनी येतील. अशा स्थितीत काही विमाने वेळेवर उड्डाण भरणार नाहीत. एअरलाईन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरहून दिल्लीला जाणाºया आणि सायंकाळी दिल्लीहून येणाºया प्रवाशांनी घरून निघताना विमानाच्या वेळेची स्थिती पाहावी. याशिवाय संबंधित विमानतळाकडून यासंदर्भात माहिती प्राप्त करावी. विमान वेळेवर असले तरीही विमानाने दिल्लीहून नागपुरात येताना विमानतळाकडे तीन तास पूर्वीच निघावे.