समाजातील गरजूंपर्यंत अन्न पोहचवा : सरकार्यवाहांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 08:14 PM2020-03-23T20:14:14+5:302020-03-23T20:18:30+5:30

‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी काम बंद असून याचा फटका कष्टकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. अशा गरजूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समोर यावे व त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचावे, असे आवाहन सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले आहे.

Delivery of food to the needs of the community: Sarkaryawah | समाजातील गरजूंपर्यंत अन्न पोहचवा : सरकार्यवाहांचे आवाहन

समाजातील गरजूंपर्यंत अन्न पोहचवा : सरकार्यवाहांचे आवाहन

Next
ठळक मुद्दे‘कोरोना’विरोधातील लढ्यात संघाचा सेवाभाव

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी काम बंद असून याचा फटका कष्टकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. अशा गरजूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समोर यावे व त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचावे, असे आवाहन सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले आहे.
‘टिष्ट्वटर’च्या माध्यमातून त्यांनी सोमवारी सकाळी हे आवाहन केले. समाजात स्वच्छता, आरोग्य जागृतीबाबत स्वयंसेवकांनी लहान लहान गटांमध्ये संवाद साधावा, तसेच गरजूंपर्यंत भोजन पोहचविण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षेनुरूप सहकार्य करावे शिवाय शासनाच्या सर्व निर्णयांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन भय्याजी जोशी यांनी केले आहे.

संघाच्या नियोजनाला सुरुवात
यासंदर्भात विदर्भ प्रांतातील एका पदाधिकाऱ्याशी संपर्क केला असता गरजूंपर्यंत मदत पोहचविण्यासाठी स्वयंसेवकांचे नियोजन सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील गरजूंपर्यंत भागनिहाय मदत पोहचविली जाणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करत मोजकेच स्वयंसेवक प्रत्यक्ष जाऊन मदत पोहचवतील, असे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून आरोग्याबाबत जागृतीदेखील नियमितपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वेस्थानकावर अडकलेल्यांना मदत 


रामेश्वरम यात्रेला निघालेले उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील ज्येष्ठ नागरिक रेल्वेस्थानकावरच अडकले. त्यांना रेल्वेत जागा मिळाली नाही. अनेक तासांपासून ते लोक अन्नाविनाच होते. भूक व तहानेने व्याकूळ झालेल्या या वृद्धांनी स्थानकाबाहेर अनेकांना मदतीचा आर्जव केला. दुपारी संघाच्या स्वयंसेवकांना याची माहिती मिळताच त्यांच्यापर्यंत अन्नपाण्यासह आवश्यक साहित्य पोहचविण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती नागपूरचे अभिषेक मिश्रा व रितेश पांडे यांनी त्यांच्या चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली. याशिवाय नवीन मिश्रा, अनुप पाटील, रितेश पिल्लेवार यांसारख्या युवकांनी ट्रॅव्हल्स एजन्सीशी बोलून ३ गाड्यांची व्यवस्था करत त्यांना मिर्झापूरकडे रवाना केले.

Web Title: Delivery of food to the needs of the community: Sarkaryawah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.