वकिलांच्या खोल्या उघडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 08:02 PM2020-06-10T20:02:40+5:302020-06-10T20:04:43+5:30

जिल्हा व सत्र न्यायालय आणि कामठी येथील न्यायालयातील वकिलांच्या खोल्या उघडण्याची परवानगी मिळावी याकरिता जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

Demand for opening lawyers' rooms | वकिलांच्या खोल्या उघडण्याची मागणी

वकिलांच्या खोल्या उघडण्याची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालय आणि कामठी येथील न्यायालयातील वकिलांच्या खोल्या उघडण्याची परवानगी मिळावी याकरिता जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
कोरोना संक्रमणामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून वकिलांच्या खोल्या बंद करण्यात आल्या आहेत. या खोल्या उघडल्यास वकिलांना तेथे बसता येईल व आवश्यक कामे करता येतील असे संघटनेचे म्हणणे आहे. याशिवाय संघटनेने नवीन दावे व अपील दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी विनंतीही न्या. देशपांडे यांना केली आहे. न्या. देशपांडे यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले आणि मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करून यावर कायद्यानुसार निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा, सचिव अ‍ॅड. नितीन देशमुख, अ‍ॅड. प्रवीण गजवे, अ‍ॅड. नरेश नेभानी यांचा समावेश होता.

Web Title: Demand for opening lawyers' rooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.