रेल्वेचे कोविड केअर सेंटर हलविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:07 AM2021-05-20T04:07:45+5:302021-05-20T04:07:45+5:30
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांसाठी रेल्वेने तयार केलेल्या कोचला कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे हे कोच ग्रामीण भागात हलविण्याची मागणी होत ...
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांसाठी रेल्वेने तयार केलेल्या कोचला कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे हे कोच ग्रामीण भागात हलविण्याची मागणी होत आहे.
नागपूर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वे कोचमध्ये आवश्यक तो बदल करून १७६ बेडचे कोविड केअर सेंटर तयार केले. हे कोच महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर हे कोच अजनीच्या कंटेनर डेपोत ठेवण्यात आले; परंतु निर्जन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी रुग्ण जात नसल्याची माहितीसमोर आली आहे. आतापर्यंत केवळ ३० रुग्णांनीच या कोचमध्ये उपचार घेतल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे हे कोच ग्रामीण भागात पाठविल्यास तेथील रुग्णांना त्याचा लाभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
.............
ग्रामीण भागातील रुग्णांना लाभ होईल
‘नागपूर शहरात कोविडच्या रुग्णांसाठी रेल्वेच्या कोचमधील १७६ बेड तयार करून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मोलाची भूमिका बजावली आहे; परंतु शहरात या कोचमधील बेडला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हे कोच ग्रामीण भागात स्थलांतरित केल्यास तेथील रुग्णांना याचा लाभ होईल.’
- बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र
...........