नागपुरात ‘आर्टिकल १५’ सिनेमाच्या विरुद्ध निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 07:51 PM2019-06-28T19:51:26+5:302019-06-28T19:53:01+5:30
अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल १५’ या सिनेमातून ब्राह्मण समाजाची प्रतारणा करण्यात येत आहे. सिनेमातून चुकीच्या गोष्टी दाखवून जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर संविधानाचे ‘आर्टिकल १५’ हे नाव सिनेमासाठी वापरून त्याचाही दुरुपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजात रोष असून, ब्राह्मण सेना व करणी सेना यांनी संयुक्तपणे सीताबर्डी येथील इंटरनेटी मॉल समोर जोरदार नारेबाजी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल १५’ या सिनेमातून ब्राह्मण समाजाची प्रतारणा करण्यात येत आहे. सिनेमातून चुकीच्या गोष्टी दाखवून जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर संविधानाचे ‘आर्टिकल १५’ हे नाव सिनेमासाठी वापरून त्याचाही दुरुपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजात रोष असून, ब्राह्मण सेना व करणी सेना यांनी संयुक्तपणे सीताबर्डी येथील इंटरनेटी मॉल समोर जोरदार नारेबाजी केली. यावेळी अनुभव सिन्हा यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. या आंदोलनात ब्राह्मण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष त्रिवेदी, प्रतीक त्रिवेदी, देवेश व्यास, आशिष दीक्षित, करणी सेनेचे अध्यक्ष प्रमोद सिंह ठाकूर, मंगेश तिवारी, गौरव मिश्रा, प्रवीण पांडे आदी सहभागी झाले होते.