राज्यात शक्ती कायदा लागू करण्यासाठी अनिल देशमुखांच्या नेतृत्त्वात निदर्शने
By कमलेश वानखेडे | Published: September 5, 2024 05:00 PM2024-09-05T17:00:30+5:302024-09-05T17:01:10+5:30
Nagpur : बदलापूरच्या घटनेतील दोषींना फाशी देण्याची मागणी
नागपूर : केंद्र सरकारने तातडीने राज्यात शक्ती कायदा लागू करावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने गुरुवारी व्हेरायटी चौकात निदर्शने केली. बदलापूरच्या घटनेतील दोषींना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झाले. यावेळी देशमुख म्हणाले, बदलापूर येथे काही दिवसापूर्वी साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला. ही घटना दाबण्यासाठी सरकारने चार ते पाच दिवस प्रयत्न केले. मी राज्याचा गृहमंत्री असताना महिलांवर असा अत्याचार झाला तेव्हा आमच्या सरकारने शक्ती कायदा लागू केला होता. या कायद्याला मंत्रीमंडळाने व विधानसभेनेही मंजुरी दिली. नंतर अंतिम मंजुरीसाठी हा कायदा केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. पण हा कायदा तीन वर्षापासून केंद्राकडे धूळखात पडला असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनात माजी आ. काश गजभिये, रमण ठवकर, जानबा मस्के, वर्षा शामकुळे, नूतन रेवतकर, अविनाश गोतमारे, शैलेंद्र तिवारी, रेखा कृपाले, राजा बेग, महेंद्र भांगे, मोरेश्वर जाधव, अरशद सिद्दिकी, राजुसिंग चव्हाण, अशोक काटले, शिव भेंडे, रिजवान अंसारी, तनुज चौबे, आशुतोष बेलेकर, अश्विन जवेरी, उषा चौधरी, बबीता सोमकुवर, सुकेशनी नारनवरे, कनिजा बेगम, संगीता खोब्रागडे, मंजू गोडघाटे, लीना पाटील, रीना लांजेवार, शशिकला भोंगाडे, बिंदू मडावी, आरती चौबे, फातिमा खान, ॲड. साळवे, शारदा कोकाटे, शालिनी मेश्राम, अनिता सुलाखे, सरिता लिल्लारे, चंद्रकांता जयस्वाल आदींनी भाग घेतला.