नागपुरात मेयोतील ३० डॉक्टरांना डेंग्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 05:52 AM2018-10-21T05:52:51+5:302018-10-21T05:52:54+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) येथील ३०वर निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यूचे निदान झाले आहे.
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) येथील ३०वर निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यूचे निदान झाले आहे. सध्या दोन विद्यार्थी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
सध्या रुग्णालयात डेंग्यूचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहेत. ३० खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल असून, नाईलाजाने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या मते, वसतिगृहातील ड्रनेज लाइन नेहमीच तुंबते. वसतिगृहाच्या आजूबाजूला पाणी साचते. त्यामुळे ते डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनले आहे.
>राज्यात १८ बळी, ४,६६७ रुग्णांना लागण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिल्लीत जारी केलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी सप्टेंबरअखेर महाराष्ट्रात १८ रुग्ण डेंग्युने दगावले होते, तर ४,६६७ जणांना डासांमुळे होणाऱ्या या रोगाची लागण झाली होती.