लोकशिक्षण केल्यास डेंग्यूवर नियंत्रण शक्य
By admin | Published: October 23, 2014 12:29 AM2014-10-23T00:29:56+5:302014-10-23T00:29:56+5:30
डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना के लेल्या आहेत. खबरदारी म्हणून काय करावे, याबाबतच्या सूचनाही केल्या आहेत. दुर्दैवाने या सूचनांचे
समन्वय बैठक : प्रवीण दटके यांचे प्रतिपादन
नागपूर : डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना के लेल्या आहेत. खबरदारी म्हणून काय करावे, याबाबतच्या सूचनाही केल्या आहेत. दुर्दैवाने या सूचनांचे पालन होत नसल्याने लोकशिक्षणाशिवाय डेंग्यूवर नियंत्रण शक्य नसल्याचे प्रतिपादन महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी केले. डेंग्यू आजाराची दखल घेत यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मनपाच्या केंद्रीय कार्यालयातील सभागृहात आयोजित शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी, इंडियन मेडिकल कौन्सिलचे पदाधिकारी व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत दटके बोलत होते.
महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात तापाच्या आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल होताच डेंग्यूचा रुग्ण आहे, असे समजून त्यावर उपचार केले जातात. त्यामुळे शहरात डेंग्यूविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजारापासून लोकांचे रक्षण करण्याची जबाबदारी मनपाची आहे. त्यामुळे शहरातील क ोणत्याही रुग्णालयात तापाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होताच त्या रु ग्णाचा सविस्तर डाटा मनपाला तातडीने द्यावा. नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून मनपा रुग्णालयात हेल्पलाईन सुरू करण्यात यावी. केबल नेटवर्क, सिनेमागृहे, फेसबुक, इंटरनेटच्या साह्याने व सोशल मीडियाच्या मदतीने डेंग्यू नियंत्रणासाठी विविध उपक्र म राबविण्याचे निर्देश दटके यांनी दिले.
बैठकीत डेंग्यूचा झोननिहाय आढावा घेतला. शहरात डेंग्यूचे १७१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. पथकामार्फ त शहरातील घरांना भेटी देण्याचे काम सुरू आहे. भेटीत ८४६९ घरे दूषित आढळून आली असून १०८६९ घरातील पाणीसाठ्यात डास, अळ्या आढळून आल्या. अबेट औषधी टाकून त्या नष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीला उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आरोग्य समितीचे सभापती रमेश शिंगारे, उपसभापती साधना बरडे, अपर आयुक्त हेमंत कुमार पवार, उपायुक्त संजय काकडे, सहाय्यक संचालक(मलेरिया) डॉ. एम.बी.गणवीर, लता मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. डी.एस.राऊ त, बाल रोगतज्ज्ञ डॉ. राजीव मोहता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.बी.हेडाऊ , डॉ. संदीप खारकर, मेयो रुग्णालयाचे डॉ. दिलीप गेडाम, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ.कुश झुनझुनवाला, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)