नागपुरात  ६०० वर बांधकामस्थळे डेंग्युचे हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 08:53 PM2021-07-29T20:53:19+5:302021-07-29T20:58:58+5:30

Dengue hotspots नागपूर शहरात सुमारे ६०० भूखंडांवर बांधकाम सुरू आहे. तसेच विविध रस्त्यांचे बांधकाम व सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी पावसाचे पाणी साठत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Dengue hotspots at over 600 construction sites in Nagpur | नागपुरात  ६०० वर बांधकामस्थळे डेंग्युचे हॉटस्पॉट

नागपुरात  ६०० वर बांधकामस्थळे डेंग्युचे हॉटस्पॉट

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांनी घेतली दखल : क्रेडाई व बांधकाम संघटनांची बैठकडेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात सुमारे ६०० भूखंडांवर बांधकाम सुरू आहे. तसेच विविध रस्त्यांचे बांधकाम व सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी पावसाचे पाणी साठत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांवरसुद्धा डासांची प्रजननक्षमता वाढत असल्याने अशा सर्व ठिकाणी तत्काळ फवारणीसह स्वच्छता करण्याचे काम सुरू करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी गुरुवारी आयोजित बैठकीत दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी क्रेडाई व विविध बांधकाम संघटनांच्या प्रतिनिधी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजय चिलकर, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. दीपाली नासरे यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. क्रेडाईचे अध्यक्ष संतदास चावला, माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे, सचिव गौरव अग्रवाल, कोषाध्यक्ष राजमोहन साहू, इमारत बांधकाम संघटनेचे अध्यक्ष प्रदीप नगरारे आणि कोषाध्यक्ष पुरुषोत्तम हरडे उपस्थित होते.

शहर तसेच जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या व मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेतानाच डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी क्रेडाई व बांधकाम संघटना यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले. महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासाच्या मदतीने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डेंग्यू डास उत्पत्तिस्‍थळे नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी.

 अशा आहेत सूचना

- सर्व मोकळ्या भूखंडांची तपासणी करावी.

- बांधकाम मजुरांची तपासणी करावी.

- डास प्रतिबंधक औषध तसेच अबेट या द्रावणाची फवारणी करावी.

- कायमस्वरूपी पाणी साचत असल्यास तिथे गप्पी मासे सोडावेत.

- डेंग्यू तसेच मलेरियाच्या आजारासंदर्भात प्रत्येक घराची तपासणी करावी.

- तापाने आजारी असलेले रुग्ण आढळल्यास त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन प्रतिबंधात्मक उपचार सुरू करावेत.

मागील १५ दिवसांत १७७ रुग्ण

शहरात मागील १५ दिवसांत १७७ रुग्ण आढळले असून, सर्वाधिक रुग्ण धरमपेठ व सतरंजीपुरा झोनमध्ये आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

Web Title: Dengue hotspots at over 600 construction sites in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.