३०० घरात आढळल्या डेंग्यू अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:13 AM2021-08-25T04:13:31+5:302021-08-25T04:13:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात झोननिहाय सर्वेक्षण सुरू आहे. मंगळवारी ७८०१ घरांचे सर्वेक्षण ...

Dengue larvae found in 300 houses | ३०० घरात आढळल्या डेंग्यू अळ्या

३०० घरात आढळल्या डेंग्यू अळ्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात झोननिहाय सर्वेक्षण सुरू आहे. मंगळवारी ७८०१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ३०० घरात डेंग्यू अळ्या आढळून आल्या आहेत.

याशिवाय १०६ ताप असलेले रुग्ण आढळून आले. १४७ जणांच्या रक्ताचे नमुने तर २४ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान १०८७ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ९९ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. चमूद्वारे १११ कुलर्स रिकामी करण्यात आले. ३०६ कुलर्समध्ये टेमिफॉस सोल्युशन तर ५९२ कुलर्समध्ये डिफ्लूबेंज्युरोम गोळ्या टाकण्यात आल्या तसेच ७८ कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.

शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरात सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Dengue larvae found in 300 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.