मंगळवारी पुन्हा २८४ घरांत आढळल्या डेंग्यू अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:16+5:302021-09-02T04:15:16+5:30

शहरातील ८१०५ घरांचे सर्वेक्षण : ४५ कूलर्समध्ये सोडले गप्पी मासे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डेंग्यूचा धोका लक्षात घेता ...

Dengue larvae were found in 284 houses again on Tuesday | मंगळवारी पुन्हा २८४ घरांत आढळल्या डेंग्यू अळ्या

मंगळवारी पुन्हा २८४ घरांत आढळल्या डेंग्यू अळ्या

Next

शहरातील ८१०५ घरांचे सर्वेक्षण : ४५ कूलर्समध्ये सोडले गप्पी मासे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डेंग्यूचा धोका लक्षात घेता शहरात महापालिकेद्वारे झोननिहाय सर्वेक्षण सुरू आहे; परंतु धोका कमी होताना दिसत नाही. मंगळवारी पुन्हा २८४ घरात डेंग्यू अळ्या आढळून आल्या आहेत.

मंगळवारी शहरातील ८१०५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी २८४ घरांमध्ये डेंग्यू अळ्या आढळून आल्या. याशिवाय ताप असलेले ११६ रुग्ण आढळून आले. १४२ जणांच्या रक्ताचे नमुने, तर १९ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान १०११ घरांमधील कूलर्सची तपासणी केली. त्यात ७८ कूलर्समध्ये डासअळ्या आढळून आल्या.

महापालिकेच्या चमूद्वारे ८१ कूलर्स रिकामे करण्यात आले. ४१५ कूलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्युशन तर ४७० कूलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंज्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच ४५ कूलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.

नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यूसंबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: Dengue larvae were found in 284 houses again on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.