काटाेल तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:10+5:302021-07-20T04:08:10+5:30
काटोल : काेराेना रुग्णसंख्या ओसरत असतानाच आता डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने आराेग्य विभागाची चिंता वाढली आहे. काटाेल व ...
काटोल : काेराेना रुग्णसंख्या ओसरत असतानाच आता डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने आराेग्य विभागाची चिंता वाढली आहे. काटाेल व नरखेड तालुक्यातील गावखेड्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत असून, यात बालरुग्णाचे प्रमाण अधिक असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.
यासंदर्भात बालराेग तज्ज्ञ डाॅ. अमाेल करांगळे यांच्याशी चर्चा केली असता, डेंग्यूला घाबरू नये, असे त्यांनी सांगितले. डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तीव्र ताप, पाेट दुखणे, मळमळ, उलटी, अंगावर लालसर पुरळ, डाेकेदुखी ही डेंग्यूची प्राथमिक लक्षणे आहेत. एडिस इजिप्ती नावाचा मादी डास चावल्यास डेंग्यूचे विषाणू शरीरात प्रवेश करून डेंग्यूची लागण हाेते. डेंग्यूच्या नियंत्रणासाठी याेग्य काळजी घेणे आवश्यक असून, घराच्या परिसरात, कूलरमध्ये पाणी साचू देऊ नये, सकाळी व सायंकाळी घराची दारे बंद ठेवावीत तसेच लहान मुलांना हातपाय झाकून राहील असे कपडे घालून द्यावे, अशी माहिती डाॅ. अमाेल करांगळे यांनी दिली.