माेवाड शहरात डेंग्यूचे दाेन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:13+5:302021-09-02T04:17:13+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : शहरात दाेघांना डेंग्यूची लागण झाल्याचे त्यांच्या तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. ही बाब अद्यापही ...

Dengue patients in Maewad city | माेवाड शहरात डेंग्यूचे दाेन रुग्ण

माेवाड शहरात डेंग्यूचे दाेन रुग्ण

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेवाड : शहरात दाेघांना डेंग्यूची लागण झाल्याचे त्यांच्या तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. ही बाब अद्यापही स्थानिक नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतली नाही, असा आराेप नागरिकांनी केला असून, शहरात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्याची मागणी केली आहे.

डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याची माहिती शहरात पसरताच नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली. याला स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. मात्र, नागरिकही स्वत:हून प्रतिबंधात्मक उपाययाेजना करताना दिसून येत नाही. शहरातील नाल्यांची नियमित साफसफाई करण्यात न आल्याने सांडपाणी काही ठिकाणी तुंबले आहे. माेकळ्या जागेवर गाजर व इतर गवत माेठ्या प्रमाणात वाढले आहे. काही ठिकाणी कचराही पडून आहे. या सर्व बाबी व दमट वातावरण यामुळे शहरात डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे दाेघांना डेंग्यू तर अनेकांना विषाणूजन्य ताप व मलेरियाची लागण झाली आहे.

दाेन महिन्यापासून शहरात काेराेनाचा एकही पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने नागरिक बिनधास्त वागत आहेत. मात्र, जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णात वाढत हाेत असताना याकडे स्थानिक पालिका प्रशासनासह नागरिकांनीही दुर्लक्ष केले. दुसरीकडे, पालिका प्रशासनाने शहरात डास प्रतिबंधक औषधांची तातडीने धूरळणी करून इतर प्रतिबंधात्मक उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

....

मलेरिया, विषाणूजन्य तापाचेही रुग्ण

माेवाड (ता. नरखेड) डेंग्यूचे दाेन रुग्ण असल्याच्या माहितीला प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. शहरात मलेरिया व विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही या खासगी डाॅक्टरांसह आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितले. हे आजार व राेगाचा प्रसार डासांमुळे हाेत असल्याने डासांंची पैदास नियंत्रणात आणावी. त्यासाठी नागरिकांनी स्वत:हून उपाययाेजना करावी, असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

...

नागरिकांनी काळजी घ्यावी

डेंग्यूला आळा घालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातील एक दिवस काेरडा दिवस पाळावा. घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील कूलरचा टब, टायर अथवा अन्य वस्तूंमध्ये पावसाने किंवा स्वत:हून टाकलेले पाणी साठवून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. नाल्यांमध्ये डासप्रतिबंधक तेल टाकावे. घराच्या अवतीभवती वाढलेले गवत काढून परिसर साफ ठेवावा. मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मच्छरदाणीत झाेपवावे, यासह अन्य सूचना आराेग्य विभागाने केल्या असून, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Dengue patients in Maewad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.