डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रूटचा भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:18+5:302021-09-02T04:15:18+5:30
नागपूर : श्रावण म्हणजे व्रतवैकल्याचा महिना. या दिवसात उपवासामुळे फळांची मागणी हमखास वाढतेच. एकीकडे श्रावणात फळांची मागणी वाढली असतानाच ...
नागपूर : श्रावण म्हणजे व्रतवैकल्याचा महिना. या दिवसात उपवासामुळे फळांची मागणी हमखास वाढतेच. एकीकडे श्रावणात फळांची मागणी वाढली असतानाच डेंग्यूच्या संकटानेही कहर केला आहे. यामुळे रक्तातील प्लेटलेट्चे प्रमाण आणि प्रतिकारशक्ती वाढविणारा ड्रॅगन फ्रूट आणखी महाग झाला आहे.
ग्राहकांची मागणी वाढल्याने फळांची आवकही वाढली आहे. मागील वर्षीपासून कोरोना संक्रमणामुळे आहारात फळांचा वापर वाढला आहे. मागणी लक्षात घेऊन उत्पादन वाढविण्याकडेही कल वाढला आहे.
...
१) फळांचे दर (प्रति किलो)
ड्रॅगन फ्रूट - १२० ते १४० रु. प्रति फळ
किवी - ९० रुपयात तीन फळे
केळी - ४० रुपये डझन
डाळिंब - १२० ते १४० रु. प्रति किलो
सफरचंद - १२० ते १४० रु. प्रति किलो
पपई - ४० रु. प्रति किलो
मोसंबी - ६० रु. प्रति किलो
चिकू - ८० रु. प्रति किलो
नासपती - १०० रु. प्रति किलो
....
डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते. यात भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. बरोबर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि विटामीन बी तसेच ९० टक्के पाणी असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याने कुठलाच रोग सहजासहजी होत नाही. यामुळे या दिवसात एक प्रकारे डेंग्यूवर ड्रगन फ्रूटचा उताराच मिळाला आहे.
...
आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त
अलीकडे देशी सफरचंदांची लागवड वाढली असून ती फळेही बाजारात यायला लागली आहेत. आधी विदेशातून फळे येत असल्याने खर्च अधिक पडायचा. त्या तुलनेत देशी फळे स्वस्त मिळायला लागली आहे. सध्या शिमलामधून नागपुरात मोठ्या प्रमाणात सफरचंद येत आहेत.
...
कोट (फळ विक्रेताची प्रतिक्रिया)
श्रावणात यंदा मागणी बरीच वाढली आहे. पुन्हा गौरी-गणपतीच्या दिवसात फळांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. आजारपणासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी फळे खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे विक्रीही वाढली आहे.
- रवी पवार, फळ विक्रेता, धंतोली
...