उपराजधानीला डेंग्यूचा डंख

By admin | Published: July 18, 2016 02:24 AM2016-07-18T02:24:28+5:302016-07-18T02:24:28+5:30

उपराजधानीत पुन्हा डेंग्यू पाय पसरत आहे. गेल्या आठवड्यात मोमीनपुऱ्यातील ११ वर्षीय मुलीचा

Dengue scar on subgroup | उपराजधानीला डेंग्यूचा डंख

उपराजधानीला डेंग्यूचा डंख

Next

नागपूर : उपराजधानीत पुन्हा डेंग्यू पाय पसरत आहे. गेल्या आठवड्यात मोमीनपुऱ्यातील ११ वर्षीय मुलीचा तर आता सोनझारीनगरातील एका २२ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. शहरातील अनेक खासगी इस्पितळात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे. श्रावण रवी पात्रे (२२), असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणला गेल्या काही दिवसांपासून ताप होता. घरच्यांनी त्याला वसाहतीतील खासगी डॉक्टरांना दाखविले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री अचानक प्रकृती गंभीर झाली. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती करण्यात आले. परंतु रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. श्रावण हा जय भोलेश्वर दहीहांडी क्रीडा मंडळाचा ‘कन्हैया’ होता. त्याने गेल्या पाच वर्षांत ५५ दहीहांडी फोडल्याचे सांगण्यात येते.
विशेष म्हणजे, गेल्या बुधवारी मोमीनपुऱ्यातील एका ११ वर्षीय मुलीचा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मृत्यू झाला.
आठवडाभरात डेंग्यूच्या दुसऱ्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग याला किती गंभीरतेने घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Dengue scar on subgroup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.