नागपुरात स्वॅब घेण्यास डेंटल, आयुर्वेद डॉक्टरांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:50 AM2020-05-15T00:50:10+5:302020-05-15T00:53:37+5:30

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन हजारावर संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु यांच्या घशातील द्रवाचे नमुने (स्वॅब) घेण्यास उशीर होत असल्याने विभागीय आयुक्तांनी बुधवारी मेडिकल अधिष्ठात्यांच्या नावाने पत्र काढले. यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय (डेंटल) व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील सहायक प्राध्यापक व निवासी डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन त्यांची स्वॅब घेण्यास मदत घ्यावी अशा सूचना केल्या आहेत.

Dental, Ayurveda doctors help to get swab in Nagpur | नागपुरात स्वॅब घेण्यास डेंटल, आयुर्वेद डॉक्टरांची मदत

नागपुरात स्वॅब घेण्यास डेंटल, आयुर्वेद डॉक्टरांची मदत

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांनी दिले पत्र : डेंटलमधील २४ तर आयुर्वेदमधील ५० डॉक्टरांना प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन हजारावर संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु यांच्या घशातील द्रवाचे नमुने (स्वॅब) घेण्यास उशीर होत असल्याने विभागीय आयुक्तांनी बुधवारी मेडिकल अधिष्ठात्यांच्या नावाने पत्र काढले. यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय (डेंटल) व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील सहायक प्राध्यापक व निवासी डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन त्यांची स्वॅब घेण्यास मदत घ्यावी अशा सूचना केल्या आहेत.
नागपुरात मेयो, मेडिकल, एम्स, माफसू, नीरी येथे कोरोनाची चाचणी केली जाते. यामुळे जास्तीत जास्त नमुने तपासणे अपेक्षित आहे. परंतु रुग्णांचे नमुनेच कमी प्रमाणात घेतले जात असल्याने क्षमतेपेक्षा कमी नमुने तपासले जात असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, संस्थात्मक अलगीकरण कक्षात सध्याच्या स्थितीत २२५३ संशयित भरती आहेत. यांचे पहिले, पाचव्या दिवशीचे व १४ व्या दिवशीचे नमुने तपासून, ते निगेटिव्ह आल्यावर घरी पाठविले जाते. परंतु सध्याच्या स्थितीत मेयो, मेडिकल व एम्समधील डॉक्टरांची चमू नमुने घेत असल्याने रोज ३०० वर नमुने घेतले जात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे क्वारंटाईन असलेल्या अनेक संशयितांचे दिवस होऊनही नमुनेच तपासले गेले नाही. किंवा नमुने घेण्यासाठी तासन्तास बसावे लागत आहे.
प्राप्त माहितीनुसार, याची दखल विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतली. त्यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी चर्चा केली. स्वॅब घेण्यास शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय व डेंटलच्या डॉक्टरांची मदत घेण्याचे पत्रच बुधवारी अधिष्ठात्यांना पाठविले. यात या दोन्ही महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक व निवासी डॉक्टर्सना प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घेण्याची सूचना केली. त्यानुसार अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी या दोन्ही महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांच्या नावे पत्र लिहून त्यांना आजच प्रशिक्षणार्थ्यांची नावे मागितली. त्यानुसार डेंटलने ९ सहायक प्राध्यापक व १६ निवासी डॉक्टरांची यादी पाठविली आहे, तर आयुर्वेदिक महाविद्यालयाने सुमारे ५० सहायक प्राध्यापकांसह पदव्युत्तर विद्यार्थ्यांची यादी पाठविल्याची माहिती आहे.
विभागीय आयुक्त यांनी लता मंगेशकर हॉस्पिटललाही स्वॅब घेण्यास मदत करण्याचा सूचना केल्या आहेत. यामुळे पुढील काही दिवसात जास्तीत जास्त स्वॅब घेऊन नमुने तपासले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Dental, Ayurveda doctors help to get swab in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.