‘डेंटल’ने घेतले कोरोना रुग्णांचे १७४८ नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:32 PM2020-06-12T21:32:06+5:302020-06-12T21:40:54+5:30
‘कोरोना’च्या काळात डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी आघाडीवर राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयही (डेंटल) समोर आहे. अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्या मार्गदर्शनात ‘डेंटल’च्या डॉक्टरांनी १७४८ रुग्णांच्या नाक व घशातील स्रावाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :‘कोरोना’च्या काळात डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी आघाडीवर राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयही (डेंटल) समोर आहे. अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्या मार्गदर्शनात ‘डेंटल’च्या डॉक्टरांनी १७४८ रुग्णांच्या नाक व घशातील स्रावाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले.
कोरोना रुग्णांचे रोग निदान करण्यासाठी नाक व घशाचे स्रावाचे नमुने घेणे गरजेचे असते. मेयो, मेडिकल व एम्सकडून हे नमुने घेतले जात होते. परंतु रुग्ण व संशयितांच्या वाढत्या संख्येने विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांच्या आदेशानुसार ‘डेंटल’ येथील डॉक्टर अधिकारी व पॅरामेडिकल कर्मचारी यांनाही नमुने घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिष्ठाता डॉ. फडनाईक यांच्या मार्गदर्शनात तीन गट नेमले. प्रत्येक गटामध्ये सहाय्यक प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. रुग्णांचे व संशयितांचे नमुने घेणे सुरू केले. फार कमी दिवसात डेंटलने १७४८ नमुने घेतले. या कार्यात डेंटल येथील नोडल अधिकारी डॉ.आशिता कळसकर, डॉ.सचिन खत्री, डॉ.कल्पक पिटर, डॉ.योगेश इंगोले, डॉ.योगेश राठोड, डॉ.श्वेता गंगोत्री, डॉ.वैशाली सार्वे, पदव्युत्तर विद्यार्थी डॉ.बेनिता फर्नांडिस, डॉ.नेहा गुप्ता, डॉ.वैष्णवी चोडणकर, डॉ.नियती मेहता, डॉ.छलांग मारक, डॉ. निहरीका मिस्त्री, डॉ.राजेश इजलकर व डॉ.सुबोध पुराहित, पॅरामेडिकल कर्मचारी आशा राठोड, राजेश राऊत, अश्चिन खांडेकर, युवराज रामटेके, मयूर टेंभरे, र्श्नितीन गेडाम, सुनील पंत, धनराज सुरपाम व जयलक्ष्मी नायडु यांनी अथक परिश्रम घेतले.