आपात्कालीन उपचारासाठी दंत चिकित्सक मागवत आहेत आरटी-पीसीआर अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:08 AM2021-04-15T04:08:18+5:302021-04-15T04:08:18+5:30

- मात्र, क्लिनिकमध्ये जाण्यापूर्वी रुग्णांची चाचणीस टाळाटाळ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाचा प्रकोप देशभरात पसरला असतानाही दंत ...

Dentists are calling for emergency treatment RT-PCR reports | आपात्कालीन उपचारासाठी दंत चिकित्सक मागवत आहेत आरटी-पीसीआर अहवाल

आपात्कालीन उपचारासाठी दंत चिकित्सक मागवत आहेत आरटी-पीसीआर अहवाल

Next

- मात्र, क्लिनिकमध्ये जाण्यापूर्वी रुग्णांची चाचणीस टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाचा प्रकोप देशभरात पसरला असतानाही दंत चिकित्सक रुग्णांवर आपात्कालीन दंतचिकित्सा करण्यास कचरत नसल्याचे दिसून येते. लोकांची वेदना दूर करण्यासाठी दंत चिकित्सक धैर्याने व स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे दिव्य पार पाडत आहेत. यासाठी ते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(आयसीएमआर)ने घालून दिलेल्या सर्व प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन करीत आहेत.

-----------------

आयसीएमआर आणि आयडीएने कोरोना महामारीबाबत कोणत्याही नव्या मार्गदर्शिका तयार केलेल्या नाहीत. तरीदेखील गेल्या वर्षभरापासून आम्ही मागील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आहोत. आम्ही रुग्णांशी ऑनलाईन संवाद साधत आहोत आणि केवळ शस्त्रक्रिया किंवा आपात्कालीन उपचारासाठीच त्यांना ओपीडीमध्ये बोलावत असतो. कोरोना प्रकोपात गेल्या तीन महिन्यापासून रुग्णांची संख्या बरीच घसरली आहे. मात्र, गेल्या १५ दिवसापासून परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे आम्ही रुग्णांना ॲन्टिजेन किंवा आरटी-पीसीआर चाचणी करण्यास सांगत आहोत. मात्र, त्यासाठी रुग्ण टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते.

- डॉ. गिरीश भुतडा, अध्यक्ष : आयडीए, नागपूर शाखा

-------------

आम्ही आमची सर्व उपचार साधने निर्जंतूक केलेली असतात आणि खुर्ची स्वच्छ करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड वापरत असतो. शिवाय, प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक स्वच्छता किट्स पुरवतो. त्यात डिस्पोजेबल हेडकॅप, ग्लोव्हज, मास्क आणि शू कव्हरचा समावेश असतो. आरटी-पीसीआर बंधनकारक नाही, तरीदेखील स्वत:च्या आणि रुग्णाच्या सुरक्षेसाठी ती विचारावी लागते. अतिजोखीम असलेल्या रुग्णांवर उपचार करणे टाळतो.

- डॉ. अनन्य हजारे, ऑर्थोडॉन्टिक्स

-------------

तोंडातील विषाणूंची संख्या कमी करण्यासाठी आम्ही रुग्णांना बिटाडिन देऊ करतो. रुग्ण परवानगी देत असेल तर ते देत असतो. त्यामुळे दोन तासाचा वेळ मिळतो. आमची उपचार प्रक्रिया पार पाडण्यास हा वेळ पुरेसा आहे. शस्त्रक्रिया करायची असेल तर आरटी-पीसीआर चाचणी करण्यास सांगतो. बहुतांश वेळा रुग्णांना ऑनलाईन सल्लाच देत असतो. त्यामुळे क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या ६० टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

- डॉ. केतन गर्ग, ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन

---------------

कोरोना संक्रमणाचा आघात सुरू झाल्यापासून आम्ही सर्वच काळजी घेत आहोत. आपात्कालीन प्रक्रियेत रुग्णांना आरटी-पीसीआर चाचणी सांगत आहोत आणि संक्रमण रोखण्यासाठी ट्रेसिंगदेखील करीत आहोत. सद्यस्थितीत तणावाची स्थिती असून, आम्ही सावधगिरी बाळगतो आहोत. भीतीमुळे रुग्णांच्या संख्येतही घट झालेली आहे.

- डॉ. पूनम हुडिया, सचिव : आयडीए, नागपूर शाखा

...............

Web Title: Dentists are calling for emergency treatment RT-PCR reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.