कृषी विभागाने केली ४५ कृषी केंद्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:44+5:302021-06-16T04:11:44+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : खते व बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्राचे दार ठोठावत आहेत. अशावेळी केंद्र संचालकांनी ...

Department of Agriculture inspected 45 agricultural centers | कृषी विभागाने केली ४५ कृषी केंद्रांची तपासणी

कृषी विभागाने केली ४५ कृषी केंद्रांची तपासणी

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : खते व बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्राचे दार ठोठावत आहेत. अशावेळी केंद्र संचालकांनी खते व बियाण्यांचा रेट व स्टॉक बोर्ड अद्ययावत ठेवावा. प्रिन्सीपल सर्टिफिकेट आवश्यक आहे. शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती द्या, पक्के बिल आणि योग्य दरात, योग्य बियाणे व खतांची विक्री करा, बोगसबाजी केल्यास कठाेर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद देत, कृषी विभागाने तालुक्यातील ४५ वर कृषी केंद्राची तपासणी केली.

तालुक्यात एकूण ५० कृषी सेवा केंद्र आहेत. त्यात नव्याने सुरू झालेल्या तीन कृषी केंद्रांनी यावर्षी पुन्हा भर घातली आहे. मागील वर्षीच्या नुकसानाची परिस्थिती पाहता यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात विविध कागदपत्रांच्या पूर्ततेवरून कृषी सेवा केंद्रावर कारवाई केल्यास शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास होऊ शकतो. त्यामुळे कृषी विभागाने यावर्षी किरकोळ कारणास्तव कारवाई शिथिल केली आहे. परंतु शेतकऱ्यांची फसवणूक हाेत असल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी पंचायत समितीचे कृषी अधिकारी रवींद्र राठाेड व मंडळ कृषी अधिकारी श्याम गिरी यांनी केंद्र संचालकांना दिली. यात प्रिन्सीपल सर्टिफिकेट, खते व बियाण्यांचा रेट व स्टॉक बोर्ड दररोज अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांना खरेदीचे पक्के बिल देण्यात यावे, असेही त्यांनी बजावले आहे.

....

कृषी विभागाला कळवा

खते, बियाण्यांची खरेदी करताना शेतकऱ्यांची कुठलीही फसगत होणार नाही, याची काळजी घ्यावी. फसवणूक झाल्यास किंवा अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवावे. संबंधित कृषी केंद्रांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. शिवाय, पेरणी व लागवड करताना काही समस्या असल्यास शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. त्यांना वेळीच याेग्य मार्गदर्शन केले जाईल, असेही रवींद्र राठाेड यांनी सांगितले.

===Photopath===

150621\1919-img-20210615-wa0121.jpg

===Caption===

कृषी सेवा केंद्राची तपासणी करतांना कृषी अधिकारी (पंचायत) रविंद्र राठाेड व मंडळ कृषी अधिकारी शाम गिरी

Web Title: Department of Agriculture inspected 45 agricultural centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.