राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईकडे प्रस्थान
By आनंद डेकाटे | Published: July 6, 2023 12:25 PM2023-07-06T12:25:23+5:302023-07-06T12:26:32+5:30
कोराडीतील सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण
नागपूर : नागपूर, गडचिरोली येथील विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीन दिवसांच्या दौर्यानंतर गुरुवारी सकाळी मुंबईकडे प्रस्थान केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ४ जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले होते. ५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच दुपारी कोराडीतील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. गुरुवारी सकाळी त्यांनी राजभवन येथे आदिवासी समुदायातील मान्यवरांशी संवाद साधला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आज निरोप देण्यात आला. राज्यपाल रमेश बैस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी यावेळी विमानतळावर उपस्थित होते.