लघु सिंचन विभागात अनामत रक्कम घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:22+5:302021-07-08T04:08:22+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातून कंत्राटदारांच्या अफरातफरीचे नवनवीन प्रकरण पुढे येत आहेत. सध्या अनामत रकमेचा घोटाळा तपासणीत ...
नागपूर : जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातून कंत्राटदारांच्या अफरातफरीचे नवनवीन प्रकरण पुढे येत आहेत. सध्या अनामत रकमेचा घोटाळा तपासणीत समोर आला आहे. कंत्राटदाराने मुदतीपूर्वीच विभागाकडे जमा केलेली अनामत व एफडीआरची रक्कम काढून घेतली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे लाखोंचे नुकसान झाले.
निविदा मंजूर झाल्यावर कंत्राट देताना संबंधित कंत्राटदाराकडून कामाची अनामत रक्कम घेण्यात येते. दायित्व काळापर्यंत ही रक्कम जमा असते. कामाची गुणवत्ता योग्य नसल्यास कंत्राटदाराकडून नव्याने काम करण्यात येते. कंत्राटदाराने काम न केल्यास या जमा रकमेतून ते काम करण्यात येते. परंतु मुदतीपूर्वीच कंत्राटदाराने रक्कम काढून घेत त्या जागी एफडीची झेरॉक्स प्रत जोडण्यात आल्याचे, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी सांगितले. यामुळे जिल्हा परिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- तपासणीत हा घोळ समोर आला. बनावट कागदपत्रे जोडून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासह फौजदारी कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.
रमेश गुप्ता, कार्यकारी अभियंता, लघु सिंचन विभाग, जि.प.